ससेवाडीत विनामूल्य आरोग्य सेवा -डाॅ. गणेश ढवळे 




 

मांजरसुबा । ग्रामिण भागातील वैद्यकीय व औषधीदुकान नसलेल्या भागातील ग्रामस्थांना ग्रामसमृद्धी चळवळ अंतर्गत सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्यामार्फत विनामूल्य तपासणी व औषधोपचार, कोरोनाविषयक जनजागृती करण्याचा उपक्रम राबवला जात असून आज दि.15 जुन मंगळवार रोजी बीड तालुक्यातील ससेवाडी गावात आरोग्य सेवा देण्यात आली.
ग्रामिण भागातील लोकांमध्ये कोरोना आजाराविषयी मोठ्याप्रमाणात गैरसमज असून अज्ञानापोटी दवाखान्यात जाण्याचे टाळून अंगावर दुखणे काढण्यात येत असल्याचे दिसून येते त्यामुळेच आजार विकोपाला जाण्याचा धोका वाढला आहे, तसेच लाॅकडाऊन कालावधीत आर्थिक संकटात सापडलेल्या गोरगरीब गरजुवंताना आरोग्य सुविधा मिळणे अवघड झाले असून तसेच गावातील वयोवृद्ध लोकांना गावातुन दवाखान्यात जाण्याची सोय नसल्यामुळेच गावात, वाड्यातांड्यावर जाऊन जनजागृती तसेच विनामूल्य आरोग्य तपासणी व औषधोपचार सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्यामार्फत ससेवाडी गावात मारोतीच्या मंदिरासमोर पारावर आरोग्य सेवा देण्यात आली.
देवराई ट्रेकिंग ग्रुप बीड चे सदस्य ससेवाडी भूमिपुत्र जिल्हापरिषद शाळेचे शिक्षक प्रभाकर उंबरे यांच्या आग्रहाखातर आरोग्य सेवा देण्यात आली यावेळी उपक्रमास बारीकराव सावंत, दादासाहेब जोगदंड पत्रकार बळवंत कदम, सखाराम सावंत आदिंनी सहकार्य केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा