पाटोदा उपविभागीय कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन !
पाटोदा l  शहरातील राज महंमद चौक येथील कब्रिस्तानातील मानवी देहाची विटंबना करणा-या तिरूपती कन्स्ट्रक्शन ठेकेदार केशव आघाव यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच पाडलेली संरक्षण भिंत बांधण्यात यावी, मौजे रूईनालकोल ता.आष्टी.जि.बीड येथील शेख महंमद दर्गाह ईनाम जमिन बनावट दस्तावेज तयार करून हडपणा-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच सावरगावघाट-मुगगाव-ब्रम्हगाव अंदाजे 4 कोटी 43 लाख रूपये निकृष्ट रस्त्याप्रकरणात गुणनियंत्रक विभागामार्फत तपासणी करण्यात येऊन संबधित दोषींवर कारवाई करण्यात यावी, तसेच दैनिक कार्यारंभ बीड चे मुगगाव येथील प्रतिनिधी अशोक राजेंद्र भंवर यांनी बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल ठेकेदार व राजकीय नेते यांनी दबाव आणून मारहाणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून संबधित प्रकरणात सखोल चौकशी करून खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.16 जुन बुधवार रोजी पाटोदा उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.आंदोलनात डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, पठाण हमीद खान, शेख अन्नेश शेख बाबुलाल, शेख जमीर दस्तगीर सहभागी होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा