ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्या- परळी पत्रकार संघाची मागणी
ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेऊन पोलीस शिपाई हरगावकर यांची खातेनिहाय चौकशी करा ; परळी तालुका व शहर पत्रकार संघाची मागणी !
परळी वैजनाथ l येथील गेल्या ३५ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई नवनाथ हरगावकर यांच्या कारभाराची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी एकमुखी मागणी परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्यासह राज्याचे सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्य मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना धनंजय मुंडे, बीडच्या खासदार प्रीतमताई मुंडे, विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद परिक्षेत्र, औरंगाबाद, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंबाजोगाई, उपजिल्हाधिकारी, परळी वैजनाथ तथा पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन परळी आदिंना पाठवलेल्या निवेदनाद्वारे वरील प्रमाणे मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर यांनी परळी शहर पोलीस ठाणे या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस शिपाई नवनाथ दत्तात्रय हरगावकर बक्कल नंबर १८२९ संलग्न आय बाईक पथक उप अधीक्षक कार्यालय अंबाजोगाई यांच्याविषयी “प्रत्येक कामात वाढता हस्तक्षेप गोरगरिबांनाही अतोनात त्रास शहर पोलीस ठाण्याच्या हरगावकर यांच्या कामाची दखल घ्या आणि वर्दी दाखवा हजार रुपये मिळवा” ह्या मथळ्याखाली बातमी दिली होती जी की वास्तविक यावर आधारित होती. ही बातमी हरगावकर यांच्या जिव्हारी आली आणि त्यांनी दैनिक लोकाशाच्या संपादकासह आणि वार्ताहर दिलीप बद्दर यांच्याविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यांमध्ये एन सी आर नंबर १२९/ २०२१ दिनांक ३ जून २०२१ नुसार गुन्हा दाखल केला.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, नवनाथ हरगावकर यांची परळी शहर पोलीस ठाण्यात आय बाईक पथकात नेमणूक आहे त्यानुसार त्यांना घटनास्थळी जाऊन पंचनामा करणे, मुद्देमाल जप्त करणे, संबंधी ठिकाणाचे फोटो काढणे आणि व्हिडिओ काढून पोलिस प्रशासनास तपास कामी मदत करणे असे आहे मात्र नवनाथ हरगावकर आय बाईकचे काम करीतच नाहीत तर केवळ कागदोपत्री त्या पथकात आहेत आणि शहर पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचे नाव जाणीपूर्वक टाकले जाते. तर ते शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षकाचे रायटर म्हणून काम करतात. प्राप्त माहितीनुसार आय‌ बाईकच्या पथकातील कर्मचाऱ्यास पोलीस ठाण्याचे दुसरे काम सांगता येत नाही मात्र हरगावकर हे बराच वेळा तपासाच्या नावाखाली वरिष्ठांची दिशाभूल करून दोन वेळा राजस्थान एक वेळा पश्चीम महाराष्ट्राच्या नावावर गोवा दौरा असे अनेक दौरे करून त्या ठिकाणच्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिलेल्या आहेत हे आपणास त्यांच्या एक वर्षाच्या आतल्या सीडीआर काढल्यानंतर समजेलच. वास्तविक पाहता आई बाईकचे हरगावकर यांना कोणत्याही आरोपीशी मोबाईलवर बोलता येत नाही मात्र त्यांनी मोबाईलवर आणि त्यांच्या घरी जाऊन बाया पोरांना धमक्याही दिल्याचे समजते. त्याचबरोबर नवनाथ हरगावकर हे कधीच आपली वर्दी घालत नाहीत हे आपणास त्यांचे गेली सहा ते आठ महिन्यांचे शहर पोलीस ठाण्याचे सी सी टिव्ही फुटेज काढल्यानंतर दिसून येईल. तेव्हा पोलीस शिपाई नवनाथ हरगावकर यांच्या एक वर्षाचे सीडीआर काढून तपासा आणि त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करा अशीही मागणी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदनावर पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष शेख बाबा शहराध्यक्ष प्रल्हाद कंडुकटले, सतीश बियाणी, बाळासाहेब कडबाने, दिलीप बद्दर, लक्ष्मण वाकडे, संजय खाकरे, प्रकाश सूर्यकर, रामप्रसाद गरड, आत्मलिंग शेटे बाळासाहेब फड, राजेश साबणे, ज्ञानोबा सुरवसे, प्रशांत जोशी, मोहन व्हावळे, संभाजी मुंडे, रवी जोशी, महादेव शिंदे, दत्ता काळे, प्रवीण फुटके, बालकिशन सोनी, भगवान साकसमुद्रे, ओमप्रकाश बुरांडे, धीरज जंगले, संतोष जुजगर, प्रेमनाथ कदम, शेख मुक्रम, अनंत कुलकर्णी, किरण धोंड, महादेव गीते, स्वानंद पाटील, अनंत गीते, धनंजय अरबुने, जगदीश शिंदे, गणेश आदोडे, गौतम साळवे, बालाजी जगतकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पोलीस अधीक्षकांना भेटणार !
ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर आणि त्यांच्या संपादकावर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याव्यतिरिक्त अलीकडच्या काळात पत्रकार संभाजी मुंडे, दत्ता काळे, महादेव शिंदे यांना देखील मारहाण करण्यात आली अशा गंभीर घटना घडून आरोपीवर थातूरमातूर कारवाई करण्यात आली. यावर लक्ष वेधण्यासाठी येत्या काही दिवसात शहरातील पत्रकारांचे शिष्टमंडळ लवकरच बीडचे पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांची भेट घेणार असल्याचे समजते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा