वडवणीत आठ महिन्यापुर्वी घडलेल्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतरही आरोपींना अटक नाही




 

पोलीस निरीक्षकांना सहआरोपी करण्यासाठी प्रेमचंद नहार यांची कोर्टात धाव

वडवणी ।  आठ महिन्यापुर्वी नडवणी येथील प्रेमचंद गुलाबचंद नहार यांना आरोपी रतनलाल नहार , विनोदकुमार उर्फ बाबुलेठ नहार , पारसमल नहार , माणिकचंद नहार , वैभव नहार व विनय नहार यांनी पाडवून , शिवीगाळ करुन लाकडाने डोळ्याजवळ दुखापत्त केली होती . गळ्यातील सोन्याची दोन तोळे वजनाची चेन तोडून घेली होती . त्यामुळे या आरोपींवर प्रेमचंद नहार यांनी गुन्हा दाखल केला होता . मा.उच्च न्यायालयाने यातील दोन आरोपींची जामीन फेटाळल्यानंतरही आरोपीना वडवणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अटक करीत नाहीत . आरोपी राजरोस वडवणीत फिरत आहेत . तसेच व्यवसाय धंदे करीत आहेत . त्यामुळे पारागीशी संगनमत करणाऱ्या पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्यसाठी प्रेमचंद नहार यांनी न्यायालयात धाव घेतली आहे . तसेच , आरोपींना अटक करण्याची मागणीही केली आहे . या प्रकरणात प्रेमचंद नहार यांच्या फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन , वडवणी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २१८/२०२० हा कलम ३२७ , ३२३ , ३२४.१.३.१४७ , १४८.१४ ९ , ५०४ व ५०६ भा.दं.विधानाप्रमाणे गुन्हा दि .११.१०.२०२० रोजी नोंद झाला आहे . अटकेच्या भितीने आरोपीनी प्रथम न्यायालय , माजलगांव येथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता . हा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर आरोपींनी मा उच्च न्यायालयात अर्ज क्रमांक १० ९ ८ / २०२० हा दाखल करन अटकपूर्व जामीन मागितली होती . हा जामीन अर्जही मा.उच्च न्यायालयाने फेटाळला . या निकालानंतर आरोपी सर्वोच्च न्यायालयात गेले नाहीत . आरोपी विनोदकुमार उर्फ बाबुसेठ नहार व माणिकचंद हिरालाल नहार यांचा जामीन फेटाळला आहे , हे पोलीसांना माहित असतानाही तत्कालीन पोलीस निरीक्षक महेश टाका सध्याचे पोलीस निरीक्षक नितीन मिरकर यांचेसह तपासी अधिकारी एन.डी.शेख व त्यांचे सहकारी मनोज जोगदंड हे आरोपींना अटक न करता त्यांना अभय देत आहेत . प्रेमचंद नहार पाठपुरावा करीत असल्याचे पाहून आरोपींनी दि .१२ मार्च २०२१ रोजी जुन्या भांडणाचा राग मनात घरून केस काढून घे . महणून प्रेमचंद नहार यांचा पाठलाग करुन बंदुक दाखवून , लोखंडी रॉड , धारदार शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केली . या वाचत फिर्यादीने पोलीस स्टेशन वडवणीव पोलीस अधीक्षक , बीड यांचेकडे तक्रार अर्ज दाखल केले . परंतु पोलीसांनी कोणतीही कारवाई केली नाही . त्यामुळे फिर्यादीने बड़वणी पोलीस स्टेशनने दखल न घेतल्याने न्यायालयात फौजदारी प्रकरण क्रमांक ३५/२०२१ ही दाखल केली आहे . या प्रकरणात अँड.एल.आर.गंगावणे हे काम पहात आहेत . वरील सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींना अटक केली नाही . उलट आरोपींना सहकार्य केले . त्यामुळे दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना या प्रकरणात गु.र.नं .२१८ / २०२० मध्ये सहआरोपी करण्यात यावे , अशी मागणी न्यायालयात केली आहे . दोषी अधिकाऱ्यांना निलंबीत करुन त्यांची खातेनिहाय चौकशी व सदर प्रकरणाचा तपास पोलीस अधिक्षक यांच्याकडे देण्यात यावा अशी मागणी न्यायालयात केली आहे . यातील रतनलाल नहार , पारसमल नहार , विनय नहार व वैभव नहार यांना न्यायालयाने दर आठवड्यात गुरुवार व शनिवार या दिवशी पोलीस स्टेशन , वडवणी येथे सकाळी १० ते १२ या वेळेत हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत . हे आरोप हजर राहतात का ? हे तपासण्यासाठी प्रेमचंद नहार यांनी पोलीस स्टेशनमधून सी.सी.टी.वी. फुटेज मागीतले आहे , त्यामुळे पोलीसही धावरले आहेत . दरम्यान प्रेमचंद नहार यांनी रिट याचिका क्र .२१७ / २०२१ ही उच्च न्यायालयात दाखल करुन गु.र.नं .२१७ / २०२० च्या तपासासाठी सक्षम अधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली आहे . तसेच , या गुन्ह्यात कलम ३०७ भा.दं.चि. हे कलम वाढविण्याचीही मागणी केली आहे .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा