डॉ. गायकवाड यांच्या चौकशीचे आदेश





औरंगाबाद : विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. डी.डी गायकवाड यांना कार्यमुक्त करून डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे हा पदभार दिलेला आहे. मात्र शासनाने डॉ. गायकवाड यांना कार्यमुक्त केले असले तरी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची चौकशी करण्याचे आदेश शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी जारी केले आहेत. विविध संघटनांनी डॉ. गायकवाड यांच्या कार्यकाळात अनेक कामांत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केलाआहे. त्यामुळे या कामांच्या चौकशीचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
डॉ. गायकवाड यांच्या कार्यकाळात अनेक नियमबाह्य कामे झाली. त्यातील अनेक कामांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप प्राध्यापक आणि सामाजिक, राजकीय संघटनांनी केला आहे. त्यामुळे, डॉ. गायकवाड यांच्या कार्यकाळातली नियमबाह्य कामांसंदर्भात विभागीय चौकशी समिती नेमावी. तसेच डॉ. गायकावाड यांच्या विरोधातील तक्रारींच्या अनुषंगाने सुनावणीसाठी बोलवण्यात यावे. या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही कार्यलयाच्या परिसरात आत्मदहन करू, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा युवक अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी डॉ. धनराज माने यांना निवेदनाद्वारे दिला होता. या निवेदनाची दखल घेऊन डॉ. माने यांनी तत्काळ डॉ. गायकावाड यांच्या चौकशीचे आदेश दिले आहे. डॉ. माने यांनी काढलेल्या पञात म्हटले आहे की, तत्कालीन डॉ. गायकवाड यांच्या कार्यकाळातील नियमबाह्य कामांसंदर्भात विभागीय चौकशी समिती नेमावी. तक्रारदारांना त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने सुनावणीसाठी बोलवण्यात यावे. तसेच, तक्रारदारांना रितसर भेटण्याची वेळ देण्यात यावी आणि त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे आदेश डॉ. माने यांनी दिले आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा