“बीडमध्ये वटपौर्णिमा उत्साहात साजरी”
बीडमध्ये वटपौर्णिमा उत्साहात साजरी”

-बीड । येथील महिलांनी या कोरोनाच्या विळख्यामुळे घरच्या- घरीच एक वडाचे झाडं लावून  आर्चना कुटे यांनी एक सामाजिक उपक्रम राबवला व कोरोनाच्या नियमांचे पालन करून वटपौर्णिमा मोठ्या आनंदामध्ये साजरी केली . हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमाच्या दिवशी वृत्त करतात. या वृत्तादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे! दीर्घायुष्य प्राप्त व्हावे ! व सात जन्मी हाच पती मिळो ! म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. निसर्ग:ताच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे .अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली.  वृक्ष एकदा पवित्र मानला की, त्याची सहसा तोड होत नाही. वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे.
हाच पूजेचा एक हेतू आहे. यावेळी कुटे ग्रुपच्या सौ.आर्चनाताई सुरेश कुटे यांच्यासह महिला भगिनी छायाचित्रात दिसत आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा