बँक अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं तर सत्कार ! नसता अधिकाऱ्याची गाढवावरून दिंड !! – अजय दाभाडे




अजय दाभाडे यांनी इशारा देताच बँक अधिकारी ताळ्यावर !

चार दिवसात प्रकरण निकाली काढण्याचा दिला शब्द !

बीड। गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील एसबीआय बँकेने शेतकर्‍यांना पीककर्जासाठी वेठीस धरले होते. तांत्रिक कारणे देत गतवर्षीच्या खरीप हंगामात पीककर्जासाठी दाखल अनेक प्रकरणे आजपर्यंत प्रलंबित ठेवली होती. याबाबत शेतकर्‍यांनी अजय दाभाडे यांच्याकडे तक्रार केल्यामुळे अजय दाभाडेंनी थेट बँकेत भेट दिली. अधिकार्‍यांना फैलावर घेताच अधिकार्‍यांनी चार दिवसात प्रकरणे निकाली काढण्याचा शब्द दिला. जर तात्काळ प्रकरणे निकाली काढली तर अधिकार्‍यांचा जंगी सत्कार करेल नसता तोंडाला काळं फासून गाढवावरुन धिंड काढेल असा खणखणीत इशारा यावेळी अजय दाभाडेंनी दिला.

खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 1600 कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ठ बँकांना देण्यात आलेले आहे. मात्र जिल्हा मध्यवर्ती बँक सोडली तर अन्य राष्ट्रीयकृत बँकाकडून पीककर्ज वाटपात शेतकर्‍यांची पिळवणूक केली जात आहे. दलालांच्या माध्यमातून आपलं उकळ पांढरं करु पाहणार्‍या काही अधिकार्‍यांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे बँकाकडून अडवणूक होत असल्यास शेतकर्‍यांनी थेट संपर्क करण्याचे आवाहन अजय दाभाडे यांनी केले होते. मादळमोही गटातील काही शेतकर्‍यांनी एसबीआय बँकेने गतवर्षीचे पीककर्जाचे प्रकरणे निकाली काढले नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. यावर अजय दाभाडे यांनी थेट बँकेत जावून ठाण मांडले. यावेळी थेट शेतकर्‍यांचे गार्‍हाणे ऐकून घेत अधिकार्‍यांना जाब विचारला. यावेळी अधिकार्‍यांनी कोरोणाचे कारण देत प्रकरणे प्रलंबित राहिल्याचे सांगितले. तेव्हा अजय दाभाडे यांनी तुम्ही चांगलं काम करा भच चौकात तुमचा जंगी सत्कार करतो, पण जर शेतकर्‍यांची अडवणूक केली तर तोंडाला काळं फासून गाढवावरुन धिंड काढत असतो असा इशारा अधिकार्‍यांना दिला. तेव्हा ताळ्यावर आलेल्या अधिकार्‍यांनी आठ दिवसाच्या आत प्रलंबित प्रकरणे आणि पंधरा दिवसात नवीन पीककर्जाची प्रकरणे निकाली काढण्याचा शब्द दिला. अजय दाभाडे यांच्यामुळे प्रकरणे निकाली निघत असल्याने शेतकर्‍यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी अजय दाभाडे, शेतकरी नेते नानासाहेब पवार, गणेश ढेंगळे, बाळू बजगुडे, नारायण बजगुडे, दुषांत जाधव, सचिन वलेकर, राजू बंगाळ, प्रशांत बजगुडे, संजय जाधव, महेश जाधव यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा