स्त्री जन्माचे अनोखे स्वागत ! १/७/२०२१ ला जन्मलेल्या कन्यारत्नासाठी समाजोपयोगी उपक्रमांची मांदियाळी
 

स्त्री जन्माचे अनोखे स्वागत ! १/७/२०२१ ला जन्मलेल्या कन्यारत्नासाठी समाजोपयोगी उपक्रमांची मांदियाळी

बीड प्रतिनिधी✍🏻: मुलगी जन्माला आली म्हणून विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून होणारा छळ … नकोशी म्हणून केला जाणारा तिरस्कार … त्यातही कहर म्हणजे मुलगी नको म्हणून केल्या जाणाऱ्या गर्भलिंग निदान चाचण्या … अशा अनेक घटना आपण नेहमी ऐकत आणि वाचत असतो . पण , सध्या मुलीच्या जन्माचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या अनेक सुखद घटनाही समोर येत आहेत . बीडमधील शिराळे पाटील कुटुंबियांनी आपल्या कन्यारत्नाचे फटाक्यांच्या आतषबाजीत धुमधडाक्यात स्वागत केले . शिवाय गुरुवार १/७ तारखेला मुलीचा जन्म झाल्याने विविध सामोजोपयोगी उपक्रम राबवून आप्तेस्ट नातेवकांनी आनंद साजरा केला.
” शिवकण्या” , असे या कन्येचे नाव ठेवण्यात आले आहे . ऍड. गोविंद नवनाथ शिराळे पाटील आणि ऍड . सोनम गोविंद शिराळे पाटील या सेवाभावी दाम्पत्याच्या पोटी ०१ जुलैला तिचा जन्म झाला . या दाम्पत्याला मुलगी झाल्याचा आनंद आणि अभिमान असल्याचे ते सांगतात . मुलगीच झाली म्हणून त्यांनी तिचे अनोखे स्वागत केले. बीड येथील रुग्णालयापासून नमोसदन येथील शिराळे पाटील यांच्या निवासस्थानपर्यंत मिरवणुकीद्वारे त्यांनी मुलीचे स्वागत केले .निवासस्थान दाखल होताच फटाक्यांची आतषबाजी व मिठाईचे वाटप करण्यात आले  . दरवाजात औक्षण करण्यात आले . मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी शिराळे पाटील दाम्पत्याने तिच्या १/७ या जन्मदिनांकानुसार सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला . त्यानुसार एकूण ७ समाजोपयोगी उपक्रमाची ( गुरुवारी ) १ जुलैला सांगता झाली . मुलीच्या जन्माच्या दिवशी अनाथ मुलांना खाऊ वाटप करुन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला . तर सांगता वृक्षरोपांचे वाटप करुन करण्यात आली.

—–
“खरे म्हणजे स्त्री ही पुरूषांपेक्षा कोठेही कमी नसते . पुरुष करतात ती सर्व कामे आता महिलाही करीत आहेत . किंबहुना काही कामात तर मुलांपेक्षा मुली आणि पुरूषांपेक्षा महिला आघाडीवर आहेत . समान सवलती आणि साधने उपलब्ध असूनही मुली मुलांपेक्षा काकणभर सरस ठरतात . मुलींमध्ये कोणत्याही प्रश्नाचे गांभीर्य लवकर बिंबते आणि देशाच्या विकासामध्ये या पुढच्या काळात मुलींचा म्हणजेच महिलांचा वाटा मोठा असणार आहे . आम्ही आमच्या नातीला उच्च शिक्षण देणार आहोत . त्यांच्या प्रत्येक आवडीनिवडी पूर्ण करण्याला प्राधान्य देऊ . भविष्यात मुलींच्या कार्यकर्तृत्वानेच आम्हाला समाजात ओळख मिळावी , अशी आमची इच्छा आहे” . – नवनाथ शिराळे पाटील (मुलीचे आजोबा).

या उपक्रमांमध्ये कोविड रुग्णांना आवश्यक औषधांचे किट , डॉक्टर , नर्स यांना पीपीई किट , गोरगरीब नागरिकांना मोफत धान्य , रक्तदान शिबीर , गो शाळेला मदत , कोरोना संकट काळात गरजू नागरिकांना मदत करणाऱ्या कोरोना योद्धयांचा सन्मान , सॅनिटायझेशन , चष्मे वाटप , निराधार आणि विधवा महिला , सफाई कामगार , घंटागाडी कर्मचारी आदींना धान्य , सॅनिटायझर , मास्क , अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप  , आरोग्य तपासणी शिबीर , रुग्णालयातील कोरोना रुग्णांना जेवण . आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे . “असे ही शिराळे पाटील कुटुंबीयांनी सांगितले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा