प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी अंबाजोगाई मध्ये -ओबीसी बांधवानी उपस्थित राहावे -वचिष्ट बडे
बीड । ओबीसीचळवळीचे अभ्यासक व महाराष्ट्र कांग्रेस कमिटीचे ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष मा.भानुदास माळी* हे रविवारी दुपारी १२ वाजता अंबाजोगाई मध्ये येणार आहेत तरी जास्तीत जास्त ओबीसी पदाधिकारी व ओबीसी बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन बीड जिल्हा ओबीसी कांग्रेस जिल्हाध्यक्ष वचिष्ट बडे यांनी केले आहे.

महाराष्ट्र कांग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष मा.नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष मा.भानुदास माळी यांचा मराठवाडा दौरा सुरू झाला आहे दिनांक 2 -07-21 रोजी औरंगाबाद 3 जूलै जालना व 4 जुलै रोजी बीड मध्ये अंबाजोगाई येथे येणार आहेत.या दरम्यान ते कांग्रेस पदाधिकारी यांच्याशी संवाद करून त्यानतर ओबीसीचे आरक्षण ओबीसीची जनगणना व इतर विषयावर ओबीसी बांधवांना
नगरपरिषदेच्या मिटींग हाॅल, अंबाजोगाई**येथे 12 वाजता मार्गदर्शन करणार आहेत.या दौरयात त्यांच्या सोबत संगीताताई तलमळे व महाराष्ट्र दौरा मुख्य समन्वयक संतोष रसाळकर असणार आहेत.सदरील कार्यक्रमला जिल्हाध्यक्ष राजकिशोर ( पापा) मोदी यांची उपस्थिती आसणार आहेत.

तरी सर्व ओबीसीं विभागाचे जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, शहाराध्यक्ष,तथा इतर सर्व पदाधिकारी यांनी रविवारी दुपारी १२ वाजता, मिटींग हाॅल नगरपरिषद, अंबाजोगाई येथे उपस्थित राहावे. असे आवाहन ओबीसीं कांग्रेस चे जिल्हा अध्यक्ष वचिष्ट बडे यांनी केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा