शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांची नफरवाडी शाळेस सदिच्छा भेट
शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांची नफरवाडी शाळेस सदिच्छा भेट
-‘बाला’ उपक्रमाची पाहणी करत केले समाधान व्यक्त

पाटोदा । तालुक्यातील आय एस ओ मानांकित जि.प.प्रा.शा.नफरवाडीस बीड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मा. श्रीकांत कुलकर्णी साहेब यांनी सदिच्छा भेट दिली.
शाळेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी शेळके साहेब यांनी त्यांचा सत्कार केला.
यानंतर कुलकर्णी साहेबांनी ‘बाला’ (Building As a Learning Aid) उपक्रमाची तसेच माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाची पाहणी करून त्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
शाळेने केलेल्या कामाबद्दल सर्व शिक्षक आणि गावकरी यांचे तोंडभरून कौतुक केले.
कोरोना कालावधी पूर्वी व कोरोना कालावधीत शाळेने राबवलेल्या उपक्रमाची पीपीटी पाहून समाधान व्यक्त केले.
या भेटीदरम्यान पाटोदा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आ.शेळके साहेब , जेष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी आ. बोंदार्डे साहेब ,आ.चाटे सर विषय तज्ञ बीड ,पारगाव केंद्राचे केंद्रप्रमुख आ.बिनवडे सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री खंडागळे सर ,शाळेतील शिक्षिका श्रीम.उपदेशी मॅडम,श्रीम.माने मॅडम,श्रीम.काकडे मॅडम, वावरे मॅडम उपस्थित होते .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा