महिलांचा चिंताग्रस्त मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला




 

एकल महिला संघटना व आरसा फाउंडेशनचा पुढाकार

बीड ।.५ संजय गांधी, श्रावण बाळ योजना तील लाभार्थी ची होणारी पिळवणूक थांबवून लाभार्थ्यांनी केलेले अर्ज तात्काळ निकाली काढावे व या योजनेचे नवीन अर्ज करण्यासाठी गावनिहाय कॅम्प घ्यावे.
दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र व 21 हजाराचे उत्पन्न ही अट नसावी व 40 हजाराचे उत्पन्न ग्राह्य धरावे.
निराधार पेन्शन मध्ये वाढ करावे.
ज्यांना रेशन कार्ड नाहीत त्यांना रेशनकार्ड देण्याची तात्काळ व्यवस्था करावी.
वाढलेले गॅस दर, व खाद्य तेलाचे भाव तात्काळ कमी करण्यात यावे.
खाजगी शाळांच्या फीस मध्ये 50% सूट द्यावी.
कोरोना महामारी च्या संकटात जर परत लॉकडाऊन लावण्यात आले तर सर्व सामान्य रोजगार वर काम करणाऱ्या महिलांच्या खात्यात 5 हजार रक्कम जमा करण्यात यावी.
बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व शहरातील घरेलू कामगार महिलांची शासकीय नोंदणी करण्यात यावी.
कोरोना परिस्थितीत महिलांना हाताला काम नाही. एकल महिलांना उद्योग व्यवसाय साठी 50 हजार कर्ज तात्काळ करावे.
निराधार महिलांना तात्काळ घरकुल देण्यात यावे. महिला आंदोलकांच्या हातामध्ये विविध प्रकारचे घोषवाक्य असलेले फलकही दिसत होते या वेळी आंदोलक महिलांनी जोरदार राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली व धोरणांचा निषेध केला नवीन अर्जासाठी निराधार पेन्शन योजनेमध्ये वाढ करावी महिलांच्या अटकेसाठी साधन उपलब्ध करून द्यावी खासगी शाळांनी ऑफिस मध्ये 50 टक्के सवलत द्यावी सर्वसामान्य रोजंदारीवरील महिलांना दोन महिन्याची चे राशन देण्यात यावे त्यांच्या साठी रोख रक्कम खात्यात जमा करावी भाजी विक्री करण्यासाठी आवश्यक सुविधा द्याव्यात निराधार महिला अपंग परीतक्क्ता प्रैढ तृतीयपंथी यांना तात्काळ घरकुल देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले या निवेदनावर रुक्मिणी नागापुरे मंगल कानडे, सुजाता मुरळे, अर्चना सानप, कोमल मस्के आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा