10 दिवसांत रस्ते मंजूर करा ;अन्यथा राज्य महामार्गावर बेमुदत चक्का जाम आंदोलन करू
जवळबनकरांचे केज तहसील समोर लक्षवेधी धरणे आंदोलन

केज  l तालुक्यातील जवळबन येथील तिन्ही मुख्य रस्ते प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडून खराब झाले आहेत. गावातील नागरिकांना, वाहनधारकांना, महिलांना, आबालवृद्धांना रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते.सद्या पावसाळ्यात तर कोणत्याही रस्त्याने जाणे मुश्किल बनले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी,आमदार, पालकमंत्री, खासदार , जिल्हा प्रशासन मूग गिळून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने अनेक वर्षांपासून जटील बनलेल्या रस्त्याची कायमस्वरूपी समस्या सोडवून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली सातत्यपूर्ण संघर्ष चालु केला आहे.याच अनुषंगाने राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज दि.5 जुलै 2021 रोजी शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत केज तहसील कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. चंदनसावरगाव-जवळबन-पावनधान-बोरीसावरगाव रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झाला होता मात्र गतवर्षी कोरोना संकटात शासनाने सदर रस्ता रद्द केला.या रस्त्याला नव्याने मंजुरी द्यावी. सावळेश्वर -जवळबन

डीघोळआंबा-कानडीबदन हे रस्ते तात्काळ स्थानिक स्वराज्य संस्थेतुन मान्यता द्यावेत आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.10 दिवसांच्या आत सदर मागण्या मान्य कराव्यात अन्यथा अंबाजोगाई-कळंब राज्य महामार्गावर बेमुदत तीव्र स्वरूपात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, जि.उपाध्यक्ष प्रमोद पांचाळ,लहू गायकवाड , सुग्रीव करपे,सरपंच शिवाजी शिंपले,संदिप करपे,दिगंबर,श्रीधर भाकरे ,अशोक साखरे, दत्ता साखरे, बालासाहेब करडकर, सुंदरराव साखरे, प्रवीण करपे,अविनाश करपे,पदमाकर करपे, दयानंद करपे, परसराम करपे, सुनील जोगदंड,अमोल करपे,विकास करपे, शिवाजी भाकरे,संदीप भाकरे, अंबादास करपे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
धरणे आंदोलनाला संभाजी ब्रिगेड, शेकाप चा पाठिंबा
संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष कैलास चाळक
शेकापचे भाई मोहन गुंड आदींनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा