बेलूरा येथे लसीकरण शिबिराचे आयोजन; सर्व नागरिकांनी लस घ्यावी – सभापती गवते




बीड। कोरोना महामारीतून बचाव करण्यासाठी लसीकरण आवश्यक असून बेलूरा (ता.बीड) येथे पंचायत समिती सभापती सारिका बळीराम गवते यांनी लसीकरण शिबीराचे आयोजन दि.८ जुलै रोजी केले होते. या शिबीरास नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
बेलूरा येथे गावात अनेकदा कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. सध्याही काही रूग्णांवर उपचार सुरू असून गावातील नागरिकांचा कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी शिबीराचे आयोजन केले होते. गुरूवारी सकाळी बळीराम गवते यांच्या हस्ते बेलूरा येथील आरोग्य केंद्रात शिबीराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पहिली लस बाबा भवर यांना देण्यात आली. आरोग्य केंद्रात कोविड-१९ चे सर्व नियम पाळून हे शिबीर आयोजीत केले होते. गावातील १८ वर्षावरील जवळपास १०० नागरिकांनी लसीकरण करून घेतले. यावेळी डॉ विकास गावडे, गोविंद गवते, राजेश केदार, पांडूरंग गवते, सचिन भवर, अंकुश गवते, दत्ता लाटे, तात्यासाहेब गवते, विष्णू लाटे, नानाभाऊ लाटे आदिंची उपस्थिती होती.

कोरोनामुळे आपल्या जवळच्या लोकांना त्रास झालेला आहे. भविष्यात हा त्रास होऊ नये, यासाठी लस घेणे आवश्यक असून बेलूरा येथे १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. प्रत्येकांने लसीकरण करून घ्यावे.
– सौ.सारिका बळीराम गवते –सभापती प.सं.बीड.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा