ग्रामविकास विभागाच्या नावे व्हायरल होणारा मॅसेज खोटा-आरेफ शेख





संगणक परिचालकांना त्रास देण्याच्या उद्देशाने खोडसर पना 

बीड। संपुर्ण महाराष्ट्रात ग्रामविकास विभागा अंतर्गत सिएसी मार्फत ग्रामपंचायत गावोगावी संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गाव पातळीवर हे काम करणारे परिचालकांना गेली ४ महिने झाले उपासमारीची वेळ आली आहे. त्यात कोरोनाची १.५ वर्ष हालाकीचे जिवन जगणारे संगणक परिचालक यांची महाराष्ट्रात खुपच हाल होताना दिसून येत आहे.
त्यांना एखाद्या रोजंदारीवर ठेवलेल्या कामगारा पेक्षा ही कमी मानधन देण्यात येते त्यातही अनेक नियम व कायदे लागू आहेत. सर्व शासकीय कामे करुन व शासनाने लादलेले आनियमातील कामे करून कुठेतरी त्यांना ५० ते १०० रूपये मिळतात त्याचाच हा डाव साधून एक वाईट इसमाने दोन दिवसांपूर्वी पुढील प्रमाणे एक खोटा व्हाट्स ऑप संदेश ग्रामविकास विभागाचा नावे तयार करुन मोठ्या प्रमाणात व्हायरल केलेला आहे…
*व्हायरल मॉसेजचा दावा खोटा – ग्रामविकास विभाग*
प्रत्येक ग्रामपंचायत ला शासनाने *ग्रा.पं.ऑपरेटर* नियुक्त केलेला आहे. त्याला शासन विशिष्ट मानधन देत आहे. वर्षानुवर्षे त्यात वाढ होत आहे.
ग्रामपंचायत ऑपरेटर कडून प्रत्येक ग्रा.पं. कार्यालयात *पिक विमा मोफत किंवा अगदी कमी मोफताना 10/- देऊन भरला जातो आहे.
शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतला CSC आयडी दिलेली आहे. तो नेमका कोण वापरतो हे सुद्धा बघितले पाहिजे.
गावातील आनलाईनचे काम मोफत करणे हे आपरेटरचे काम आहे. अनेक गावात हा उपक्रम चालू आहे. आपल्या गावात तो चालतो का ??
तरी सर्व गावकऱ्यांनी बाहेर पैसै खर्च न करता, ग्रामपंचायत येथे जाऊन आपला पिक विमा भरून घ्यावा.
जिथे ग्रामपंचायत ऑपरेटर हा पीकविमा ऑनलाईन करून देत नसेल तर त्याची तक्रार ग्रामसेवक किंवा पंचायत समिती कडे करावी ही विनंती.
ग्रामविकास मंत्रालय, मुंबई
याशा प्रकारे खोडसाळ पाना मुळे कोणीतरी संगणक परिचालक यांना त्रास व्हावा व गावातील राजकारण आधिक त्रिव व्हावे या हेतूने संदेश टाईप करून व्हायरल केले आहे..
पिंपळवाडी ग्रामपंचायत चे संगणक परिचालक आरेफ शेख यांनी आज सायंकाळी ४ च्या सुमारास ग्रामविकास विभागाच्या या संदेशाची सत्यता तपासण्यासाठी कॉल केला असता हा संदेश ग्रामविकास विभागाकडून पाठविण्यात आला नाही आसे स्पष्ट सांगितले आहे. व प्रत्येक गावपातळीवर केंद्र चालकांना सहकार्य करुन सेवेचा लाभ मिळविता येते आसे स्पष्ट माहिती दिली आहे.
तरी व्हायरल होनारा मॉसेज आपन फॉरवर्ड न करता व गाव पातळीवर राजकारण न करता योग्य त्या सुविधा केंद्र चालकांकडून घेण्याचे आव्हान संगणक परिचालक आरेफ शेख यांनी केले आहे

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा