पीकविमा भरण्यासाठी 15 जुलै अंतिम मुदत – जिल्हा कृषी अधीक्षक 




पीकविमा भरण्यासाठी 15 जुलै अंतिम मुदत – जिल्हा कृषी अधीक्षक

बीड । पीकविमा भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै आहे. शेवटच्या टप्प्यात तांत्रिक अडचणी निर्माण होतात म्हणून शेतकऱ्यांनी वेळ न घालवता वेळेत विमा भरून या योजनेत सहभागी व्हावे. तसेच विमा सहभाग नोंदविताना मोबाइल क्रमांक देण्यात यावा. जेणेकरून विमा सहभागाबद्दल सर्व माहिती मोबाइल संदेशाद्वारे मिळेल.
सीएससी केंद्र बँकांनी शेतकऱ्यांकडून तलाठ्यामार्फत सातबारा देण्याचा आग्रह करू नये. सीएससी केंद्रचालकाने विनाशुल्क विमा भरून घ्यावा. कर्जदार शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होण्याबाबत कर्जखाते असलेल्या बँक शाखेत विहीत नमुन्यात स्वतंत्र घोषणापत्र सादर करणे बंधनकारक आहे. जे कर्जदार, शेतकरी घोषणापत्र देणार नाहीत. त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल. इच्छुक शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात, भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत कार्यरत असलेल्या पीकविमा सुविधा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी चित्ररथाद्वारे गावोगाव पीकविमा योजनेसंदर्भात जनजागृती केली जात आहे. गुरुवारी या चित्ररथांना हिरवा झेंडा दाखवून जनजागृती मोहीम राबवण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब गंडे व विमा कंपनीचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

ऐनवेळी धावपळ होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी वेळेत पीकविमा भरून घ्यावा. तसेच एकाच केंद्रावर गर्दी करू नये. पीकविमा भरल्यामुळे पिके संरक्षित होतात. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घ्यावा.
दत्तात्रय मुळे, जिल्हा कृषी अधीक्षक, बीड 

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा