महिलेचा विनयभंग ; अपंगास कुर्‍हाडीने गंभीर मारहाण दिंद्रुड पोलीस हद्दीतील घटना




दिंद्रुड । (प्रतिनिधी) धारूर तालुक्यातील देवदहिफळ येथील शिवारात अपंग शेतकऱ्यासह, तीन महिलांना, शेतीच्या जुन्या वादातून महिलेचा वाईट उद्देशाने विनयभंग करत कोयता, कुर्‍हाडीने गंभीर मारहाण करण्याची घटना काल रविवार (११ जुलै) रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडली.
अधिक वृत्त असे की, दिंद्रुड, ता.माजलगाव येथील रंगनाथ हरिभाऊ साखरे वय ७५ वर्ष यांची धारुर तालुक्यातील देवदहिफळ शिवारात गट क्रमांक ५२ मध्ये शेती असून नेहमीप्रमाणे साखरे कुटुंबीय शेतात खुरपणी, मशागती करिता मजुर महिलां समवेत शेतात खुरपणी करत असताना आरोपी सुनील बडे व दिलीप बडे यांनी फिर्यादी महिलेच्या जावा च्या अंगावर वाईट उद्देशाने हात टाकला असता फिर्यादी महिला व पीडितेने आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून त्यांचे सासू-सासरे धावत आले. आरोपींनी त्यांच्या हातातील कोयता, कुर्‍हाडीच्या सहाय्याने महिलेच्या पाठीवर, अपंग शेतकऱ्याच्या हातावर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केले तसेच फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत भांडणात पडली असल्याची फिर्यादी महिलेने दिंद्रुड पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणात फिर्यादी महिला, तिचा लहान मुलगा, जाऊ, वृद्ध सासू, अपंग सासरे सर्वांनाच आरोपींनी शेतातील जुन्या वादाची कुरापत काढून महिलांचा वाईट उद्देशाने विनयभंग करत कुटुंबीयांना जीवे मारून टाकण्याच्या धमक्याही दिल्या असल्याची फिर्याद सदरील महिलेने दिंद्रुड ठाण्यात दिली असून फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी सुनील सुदाम बडे, दिलीप सुदाम बडे, ज्ञानोबा दौलत बडे, महेश ज्ञानोबा बडे, सुदाम शेषराव बडे व एक अनोळखी सर्व राहणार देवदहिफळ यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 354 324 149 148 147 143 व अपंग व्यक्तीस गंभीर मारहाण केल्याबाबत अपंग व्यक्तीचा अधिकार अधिनियम 2016 नुसार कलम 92 नुसार दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार असून पुढील तपास सपोनि प्रभा पुंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार मायादेवी मस्के करीत आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा