कोरोनायोद्धा हर्ष पोद्दार यांनी लॉकडाऊनमध्ये केलेल्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल
 

बीड । प्रतिनिधी तत्कालीन पोलीस अधीक्षक तथा अमरावती येथील राज्य राखीव दलाचे समादेशक हर्ष पोद्दार यांनी बीडमध्ये असताना कोविडच्या काळात अहोरात्र काम करत जिल्ह्यामध्ये कोरोनाचा शिरकावसुद्धा होवू दिला नव्हता . त्यांनी बीड जिल्ह्यात कोरोना काळात केलेले पोलिसींग जगातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठापैकी एक असलेल्या न्यू न्यूयॉर्कस्थि कोलंबिया स्कूल ऑफ इंटरनॅशनल अॅण्ड पब्लिक अफेअर्सच्या माध्यमातून आता आंतरराष्ट्रीय अभ्यासाचा विषय झाला आहे . त्यांच्या कार्याची दखल जगाने घेतली असली तरी त्याचा सर्वात जास्त फायदा हा बीड जिल्ह्यातील नागरिकांना झाला आहे . त्यांच्यामुळे अनेकांचे जीव वाचले आहे . अनेकजण कोरोनापासून कोसोदूर राहिले होते . बीडकर अजूनसुद्धा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचे आभार मानत आहेत . कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये बीड जिल्ह्यात सुरुवातीला कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता . तब्बल दिड ते दोन महिने जिल्ह्याला कोरोनापासून दूर ठेवण्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे पोलीस अधीक्षक हर्ष पोदार यांचे नाव सर्वप्रथम येते . ७० हजार ऊसतोड कामगार सुखरूप जिल्ह्यात पोहोचले . एक लाख ६० हजार कामगारांची घरवापसी झाली . जिल्ह्यातील सर्व सीमा काटेकोर बंद करून जिल्ह्यातून कोणी बाहेर जाणार नाही व जिल्ह्यात कोणी येणार नाही याची खबरदारी घेतली . यासह ३०० हून अधिक आंतरजिल्हा रस्ते पूर्णपणे सील केले . कॉन्ट्रॅक्ट ट्रेसींग सेलमार्फत ३५० जणांना क्वॉरंटाईन करत त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले . यासर्व परिस्थितीत योग्य नियोजन केल्यामुळे जिल्हा हा कोरोनापासून दूर राहिला होता . याच सर्व कामाची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे . पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचे सर्वत्र कौतूक होत आहे ..

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा