बीड मधील शिधा पत्रिकांचे ऑनलाईन डाटा एंट्री तात्काळ सुरू करा- सविता जैन




बीड ।
सर्व सामान्यांना होत असलेल्या आरोग्यविषयक समस्यांसह अन्नधान्याचा प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून शिधापत्रिका ऑनलाइन डाटा तात्काळ सुरू करण्यात यावा अशी मागणी समाजसेविका सविता जैन यांनी केली आहे .

याविषयी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की गेल्या सहा महिन्यांचा कालावधी पेक्षा जास्त होऊन शिधापत्रिका ऑनलाइन कार्य प्रशासकीय आदेशावरून थांबविल्याचे कळते यामागचे कारण जे काही असेल ते जिल्हा प्रशासनाला माहीत असेल परंतु प्रशासनाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य गोरगरीब पिवळ्या शिधापत्रिका धारकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे गेल्या सहा महिन्यांपासून अनेक गरजूंना शिधापत्रिका ला मिळाला मात्र शिधापत्रिका ऑनलाइन नोंदणी बंद असल्याने त्यापासून अडचण असून खोळंबा प्रमाणे झालेला आहे गोरगरीबाचा ज्यांचे आरोग्यविषयी मोठमोठ्या शासकीय करणे गरजेचे आहे कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक दृष्ट्या पुरते हतबल झाल्याची अशा गोरगरीब शासनाकडून फूल ना फुलाची पाकळी या धर्तीवर रेशन दुकानांना येणारे गहू आणि तांदूळ तरी त्यांना मिळालेल्या शिधापत्रिकांना मिळावे अशी अपेक्षा असताना त्यांना मिळालेले शिधापत्रिका ऑनलाइन होत नसल्याने राशन दुकानदारांवरील अत्यावश्यक पासून सुद्धा वंचित राहावे लागत आहे एकत्रित हेही सर्व परिस्थिती पाहता आपल्या जिल्हाधिकारी, प्रशासनाचे प्रमुख म्हणून शिधापत्रिका बंद केलेल्या ऑनलाईन डाटा इंट्री पुरुष सण सुरू करावी आणि सर्वसामान्य आरोग्यविषयक समस्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या कृतीतून हातभार लावावा अशी मागणी समाजसेविका सविता जैन यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

काही ठिकाणी स्वस्त धान्य दुकानदार शिधापत्रिका ऑनलाइन डाटा एंटी असूनसुद्धा गोरगरिबांची अडवणूक करत आहे ही अडवणूक तात्काळ थांबवावी अशीही मागणी समाजसेवीका सविता जैन. केली आहे

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा