खाद्य तेलाचे भाव कमी झाल्याने दिलासा




पुणे : खाद्य तेलाच्या किमतीने काही दिवसांपूर्वी पावणे दोनशेचा टप्पा ओलांडून द्विशतकाकडे वाटचाल सुरू होती. परंतु मोठ्या प्रमाणात आयात करण्यात आल्यामुळे पुन्हा घसरण सुरू झाली आहे. खाद्यतेलाच्या दरात जवळपास 30 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. त्यामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तरीही खाद्यतेलाच्या किमती शंभरपर्यंत येण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
यंदाच्या दिवाळीत खाद्यतेलाचे भाव कमी झाल्याचे उलट चित्र पहायला मिळाले. प्रतिवर्षी दिवाळीत तेलाचे दर वाढत असतात. परंतु यंदा दिवाळीत तेलाचे दर कमी होऊन दिवाळीनंतर ते वाढतच चालल्याचे पहायला मिळाले. वर्षभरात खाद्यतेलाच्या किमतीत दुपटीने वाढ होऊन द्विशतकी वाटचाल सुरू केली होती. एकीकडे पेट्रोलने शंभरी ओलांडल्यानंतर आता खाद्यतेलाच्या किमती द्विशतक पार करणार काय ? अशी भीती व्यक्त होत होती. महागाईने कळसच गाठला असून, सामान्यांचे जगणे कठीण बनले आहे. इंधन आणि गॅस दरवाढीबरोबर खाद्यतेलाच्या किमतीत प्रथमच भरमसाट वाढ झाल्यामुळे गृहिणींकडून संताप व्यक्त होत होता. सामान्यांचे बजेटच कोलमडल्याचे चित्र सध्या पहायला मिळते. गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाच्या आयात झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून महिन्यापूर्वी खाद्यतेल भाव उतरत आहेत आशी प्रतिक्रिया
अक्रम जमादार तेल विक्रते यांनी दिली.

सूर्यफूल तेल 165-170
(185-195)
सोयाबीन तेल 135-145
(165-175)
शेंगदाणा तेल 180 ते 185
(210-220)

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा