केंद्रीय कर्मचाऱ्यांना 28 टक्के DA मिळणार




नवी दिल्लीः मागील दीड वर्षापासून डीए आणि थकबाकीच्या प्रतीक्षेत असलेल्या कोट्यवधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे. सूञांच्या माहितीनुसार, मागील 1 वर्षात तीनदा महागाई भत्त्याला (DA) ब्रेक लागला होता. परंतु आता 1 जुलैपासून सामान्य महागाई भत्ता मिळणार असल्याचे सांगण्यात आला आहे. म्हणजेच आतापर्यंत केंद्रीय कर्मचार्‍यांना 17 टक्के मिळणारा महागाई भत्ता आता 11 टक्क्यांनी वाढून थेट 28 टक्के करण्यात आला आहे. यास आर्थिक व्यवहारविषयक कॅबिनेट समितीने (सीसीईए) मान्यता दिलेली आहे.

डीए 17 वरून थेट 28 झाला टक्के : जानेवारी 2020 मध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये चार टक्के वाढ झालेली आहे. यानंतर दुसऱ्या सहामाहीत (जून 2020) तीन टक्क्यांनी वाढ झाली. जानेवारी 2021 मध्ये यात चार टक्क्यांनी वाढ झाली होती. अशा प्रकारे कर्मचार्‍यांना डीए 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढवून फायदा होणार आहे. मात्र, सरकारने मागील वर्षी जानेवारीपासून त्यावर बंदी घातली होती. आता दीड वर्षानंतर तिन्ही हप्त्यांवरील स्थगिती काढून टाकण्यात आली.

कोरोनामुळे गोठवला होता डीए : कोरोना महामारीमुळे सरकारने डीए गोठविलेला होता. यासह माजी कर्मचार्‍यांच्या डीआरचे हप्तेही दिले गेले नाहीत. अर्थ मंत्रालयाने जून 2021 पर्यंत 50 लाखांहून अधिक केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 61 लाख निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्ता (DA) वाढवून देण्याचे मान्य केले होते.

अशा प्रकारे केली जाते डीएची गणना : महागाई भत्ता (DA) च्या मोजणीसाठी सरकार अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर हा आधार मानते आणि त्याआधारे दर दोन वर्षांनी सरकारी कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये बदल केला जातो.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा