दत्तात्रय भिसे यांची शुभ कल्याण पतसंस्थेच्या ठेवीचा अपहार व फसवणुकीच्या तिन्ही गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन मंजुर




दत्तात्रय भिसे यांची शुभ कल्याण पतसंस्थेच्या ठेवीचा अपहार व फसवणुकीच्या तिन्ही गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन मंजुर

बीड l – शुभ कल्याण मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि.हावरगांव ता.कळंब जि.उस्मानाबाद च्या शाखा नेकनूर, शाखा बोड व शाखा गेवराई येथील ठेवीदार ग्राहक यांनी दाखल केलेल्या बीड शहर, नेकनूर व गेवराई पोलीस स्टेशन येथील शुभ कल्याण पतसंस्थेच्या ठेवीचा अपहार व ठेवीदारांचा विश्वासघात, फसवणुकीच्या तिन्ही गुन्ह्यामध्ये मा सत्र न्यायाधिश बोड यांनी आरोपी दत्तात्रय भिसे यांची अटकपूर्व जामीन मंजुर केली आरोपी तर्फे अॅड.गंगावणे एल. आर. यांनी काम पाहिले.

सदर घटनेचे सविस्तर वृत्त असे की, शुभ कल्याण मल्टोस्टेट को. ऑप.क्रेडीट सोसायटी लि.हावरगांव ता.कळंच जि.उस्मानाबाद च्या शाखा नेकनुर, शाखा बीड व शाखा गेवराई यांनी सदर शाखेचे मुख्य चेअरमन दिलीप शंकरराव आपेट व त्यांच्या अधिकारी, कर्मचान्यांनी फिर्यादी व इतर ग्राहकांना ज्यास्त व्याजाची, पेशाची विविध लाभ देण्याचे अमीष दाखवून फिर्यादो कडुन व इतराकडुन सन 2014-15 व सन 2016 पासुन बेकायदेशीर अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब करुन ठेवी जमा करून घेतल्या व त्यांना मुदत ठेवीवर वार्षीक 16% व 17% व्याज देण्याचे आमीष दाखवले तसेच कमी कालावधीत दामदुप्पट, दाम तिप्पट देण्याचे आमीष दाखवले, मात्र त्यांनी फिर्यादी व इतर ग्राहकांना ठेवीच्या मुदती संपल्यानंतर मुळ ठेवींची रक्कम व त्यावरील व्याज देण्यास टाळाटाळ केली त्यामुळे फिर्यादी मारुती बाबुराव जोगदंड यांनी नेकनुर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यावरुन गुन्हा क्रमांक 71/2018, फिर्यादी शेख फरजाना आबु तालीब यांनी पोलीस स्टेशन बीड शहर येथे तक्रार दिल्यावरून गुन्हा क्र. 106/ 2018, फिर्यादी शोभा द्वारकादास दरक यांनी गेवराई पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यावरुन गुन्हा क्र. 194/2018 कलम 420, 406, 409 कलम 120 (ब), भा.दं.वि. व कलम 3.4 एम.पी.आय.डी. अॅक्ट नुसार, आरोपी दिलीप शंकरराव आपेट, दत्तात्रय महादेव भिसे व इतरा विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. अटकेच्या भितीपोटी आरोपी दत्तात्रय भिसे यांनी बीड येथील सत्र न्यायालयात अॅड.गंगावणे यांच्या मार्फत वरील तिन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन दाखल केला होता आरोपीच्या वतीने केलेला युक्तीवाद व गुन्ह्यातील आरोपीच्या बाबतीत गंभीरता व त्याच्या विरोधात असलेले पुरावे पहाता मा. सत्र न्यायालयाने आरोपी दत्तात्रय भिसे यांना वरील तिन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर केलो. आरोपीच्या वतीने अॅड. गंगावणे एल. आर. यांनी काम पाहिले त्यांना अॅड.डी.ए.मडके, (हायकोर्ट) औरंगाबाद, अँड.ए.एस. गायकवाड, सतीश शिगवी यांनी सहकार्य केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा