सत्तेत असो वा नसो विकासाची कामे चालूच राहणार- माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर




 

अण्णांच्या माध्यमातून प्रत्येक गावातील प्रश्नांची सोडवणूक होईल-कुंडलिक खांडे

बीड ।
कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून मला देखील उत्साहाने निर्माण होतो सत्तेत असो वा नसो विकासाची प्रक्रिया चालूच राहील चमकणारी वस्तू सोनेच असते असे नाही हे आता सिद्ध झाले आहे प्रश्न अनेक प्रलंबित आहेत जनतेच्या प्रश्नावर शिवसैनिकांनी आता सतर्क राहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे.

यावेळी उपस्थित माजी जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप, किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते सर, महिला जिल्हाप्रमुख संगिता ताई चव्हान, जिल्हा समन्वयक जयसिंग मामा चुंगडे, जिल्हा सचिव वैजिनाथ नाना तांदळे, दिलिप अण्णा गोरे, जिल्हा संघटक नितिन धांडे, उप-जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, आशिष मस्के, तालुकाप्रमुख गोरख सिंघण, कलिदास नवले, रतन तात्या गुजर, शहर प्रमुख सुनील सुरवसे, नगरसेवक शुभम धूत, अर्जून दादा नलावडे, शेख फरजणा, देवराव आबा घोडके, सखाराम देवकर,संदीप सोनवणे, मनिष भोस्कर, दत्ता काशीद, सरपंच दिलीप आहेर, बाळू फड, विष्णू शेंडगे, चंद्रसेन खोड, मुकेश भोकरे, रवींद्र कुलकर्णी, उप सरपंच पांडूरंग गवते, रोहीदास गोरे, विकास आघाव, भैय्या भोस्कर, अनिल भोस्कर, विकास गवते, बालाजी गवते, यशवंत कडवणे, महेश सोळुंके, योगेश काशीद, स्वप्निल भानप, सुरेश काशीद, छत्रभुज काशीद, गुलाब गिरी, रहमान शेख, तय्यब शेख, भगवान पवार, भीमराव गायकवाड, यांच्या सह जिल्हा शिवसेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, विभागप्रमुख, उप-विभागप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिव संपर्क अभियानाच्या माध्यमातून प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा गावातील समस्या जाणून घेण्यात येत असून अण्णांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रत्येक गावातील समस्या मांडण्यात येतील यासाठी आणखी पाठपुरावा करून रस्ते वीज पाणी या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक निश्चित केली जाईल गाव तिथे शाखा आणि घरात येते शिवसैनिक ही संकल्पना राबवून शिवसेनेचे संघटन मजबूत करणार आहोत शासनाच्या योजना गावापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून बीडच्या पंचायत समितीच्या योजना कोणी घशात घातल्या हे आता सर्वांनाच माहित झाले आहे ज्यांना निवडून दिले त्यांनी गावागावात काय दिवे लावले हे सर्वांनी पाहिले आहे त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकांनी शासनाच्या योजना राबवल्या जातात की नाही हे पाहिले पाहिजे असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की अभियानाच्या माध्यमातून लोकांच्या समस्या जाणून घेणे व त्या सोडवणे हा उद्देश आहे अडचणी असतानाही राज्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहे संभाव्य अडचणींवर मात करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे संकटे कितीही आली तरी विकासाची साखळी पुढे नेहमीच लागते पक्ष वाढीचा प्रत्येकालाच अधिकार असतो विश्वस्त म्हणून सरकार काम करत असते जनतेचे पाठबळ मिळणे खूप गरजेचे असते सत्तेत असल्यानंतर कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात दोन वर्षात संवाद तुटला होता, कामे खोळंबली होती, शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न सोडवणे फार महत्वाचे आहे बीडचा पॅटर्न पिक विमा कंपनीचा फायदा करून देणारा आहे ्यामुळे शेतकर्‍यांचा त्यात काहीच फायदा नाही पीक विम्याचा लाभ थेट शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हे पाहणे गरजेचे आहे, पाणीपुरवठा बंधारे, रस्ते विजेचा प्रश्न असे अनेक प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहे मुख्यमंत्री ग्रामसडक चे ही अनेक प्रस्ताव मी स्वतः दाखल केले आहेत आता नवीन दोन महसूल मंडळे तयार झाली आहेत त्यामुळे अनेक प्रश्न सुटतील आपण दाखल केलेले प्रस्ताव मंजूर झाले असून यावर काहीजण आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रयत्न करत आहे सर्वांनी एकदिलाने काम करणे गरजेचे आहे जय-पराजय हे चक्र चालतच असते विकासाची कामे कोणीही रोखू शकणार नाही शिवा संपर्क अभियान च्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नावर शिवसैनिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे कार्यकर्त्यांचा उत्साह बघून मला देखील उत्सा आला आहे सत्तेत असो वा नसो विकासाची प्रक्रिया चालूच राहील चमकणारी वस्तू सोनेच आहे असे नसते हे आता सिद्ध झाले आहे प्रश्न अनेक प्रलंबित आहेत कार्यकर्त्यांच्या उत्साहाने मलादेखील शक्ती मिळते यापुढे प्रत्येक गावच्या प्रश्नांचा आढावा घेऊन ते सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील असेही ते म्हणाले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा