सामाजिक न्या. मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम
आज श्री.धनंजय मुंडे साहेब…
परळी । मंत्री सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग यांच्या वाढदिवसानिमित्त समाज कल्याण विभाग बीड यांच्या वतीने दिव्यांग कल्याण निधीमधून जुन्या योजनेला फाटा देत दिव्यांगाला 3 चाकी स्कूटर adopter सहित देण्यात आले.नेहमीच्या जुन्या योजना पिठाची चक्की,टिन पत्रे , शेळ्या वाटप या योजनेला फाटा देत नावीन्य पूर्ण योजना श्री.कल्याण आबुज,सभापती समाज कल्याण समिती यांच्या संकल्पनेतून तय्यार करण्यात आली.त्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व सदस्यांनी सहमती दर्शविली.आणि आज दिणांक 15 जुलै रोजी पालकमंत्री महोदयांच्या वाढदिवशी जिल्ह्यातील 27 दिव्यांगाना स्कूटर वाटप करण्यात आले.
त्यासाठी मंत्री महोदयांनी त्यांचे बंधू श्री.अजय मुंडे जिल्हा परिषद सदस्य याना पाठविले आणि त्यांच्या हस्ते दिव्यांगाना स्कूटर वाटप करण्यात आले.त्यावेळी डॉ.सचिन मडावी सहाय्यक आयुक्त बीड, श्री.रवींद्र शिंदे जिल्हा समाज कल्याण अधिकारी,इतर जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते .
महाराष्ट्रात सेस फंड मधून स्कूटर वाटप करणारी बीड जिल्हा परिषद ही पहिलीच जिल्हा परिषद ठरली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा