ना.धनंजय मुंडे वाढदिवसाच्या निमित्ताने गोपीनाथगडावर नतमस्तक ।
 

नाथरा येथे स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्याही स्मृतीत नतमस्तक

परळी । दि. 15: राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त गोपीनाथगड (पांगरी) येथे जाऊन स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिस्थळी दर्शन घेतले. त्याचबरोबर त्यांनी नाथरा येथे स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.

15 जुलै हा ना. धनंजय मुंडे यांचा जन्मदिवस, दरवर्षी राज्यभरातून ना. मुंडेंचे समर्थक मोठ्या संख्येने व उत्साहात परळी येथे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. परंतु कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधांमुळे यावर्षी ना. धनंजय मुंडे यांचा जन्मदिन साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे.

मंत्रिमंडळातील मंत्री महोदय, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच ना. मुंडेंच्या समर्थकांकडून ना. मुंडेंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांनी आज गोपीनाथ गडावर जाऊन स्व. गोपीनाथराव मुंडे यांना आदरांजली अर्पण करून दर्शन घेतले. पिता स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या स्मृतिस्थळासही पुष्पहार अर्पण करून त्यांनी दर्शन घेतले. तसेच नाथरा या त्यांच्या जन्मगावी जाऊन त्यांनी नाथरा येथील हनुमान मंदिरातही दर्शन घेतले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा