पंकजा मुंडें अडचणीत; वैद्यनाथ साखर कारखान्यावर मोठी कारवाई




औरंगाबाद : भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसलेला आहे. त्यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यानाथ सहकारी साखर कारखान्याचं बँक खाते सील केले आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कामगारांची भविष्य निधीची रक्कम जमा न केल्याने, या कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे.
औरंगाबादचा भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने वैद्यनाथ कारखान्याचे बँक खाते सील केलेले आहे. एवढच नाहीतर त्यातून ९२ लाख रुपये जप्त देखील करण्यात आले. वैद्यनाथ कारखान्याने पीएफची रक्कम थकवली होती, त्यांना नोटीस देण्यात आली होती. मात्र तरीही रक्कम न भरण्यात आल्याने कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे. त्यातून रक्कम वसूल करण्यात आलेली आहे, अशी माहिती औरंगाबाद पीएफ ऑफिसचे क्षेत्रीय आय़ुक्त जगदीश तांबे यांनी एका मराठी वृत्तवाहीनीशी बोलताना दिली आहे.
कारखान्याने २०१८ ते ऑगस्ट २०१९ कालावधीत पीएफची रक्कम भरणा केली नव्हती. पीएफपोटी थकीत रक्कम १ कोटी ४६ लाख रुपये आहे. त्यामुळे थकीत रक्कम वसुली सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी वानखेडे यांनी वसुली नोंदवली, उर्वरित रक्कम वसुलीसाठी कार्यवाही सुरू असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा