दहावीचा निकाल जाहीर यंदाही मुलींनीच मारली बाजी
मुंबई : महाराष्ट्रात दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 99. 95 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 100 टक्के, मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध होतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, दोन्ही साईट डाऊन झाल्या आहेत.  हा निकाल विद्यार्थ्यांना http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

राज्यात 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण

1) एकूण 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण

2) राज्यातील नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

3)श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार

4)मुलांचा निकाल 99.94 टक्के,

5) मुलींचा निकाल 99.96 टक्के

6)12 384 शाळांचा निकाल 100%

7) 4922 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. तीन वर्षांच्यापूर्वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल मिळाला नाही. त्यांचा निकाल नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा