भारताने लंकेला लोळवलं, धवन-द्रविडने विजयाचं खातं उघडलं, लोक म्हणाले, ‘आता रवी शास्त्रीला हटवा!’




भारताने लंकेला लोळवलं, धवन-द्रविडने विजयाचं खातं उघडलं, लोक म्हणाले, ‘आता रवी शास्त्रीला हटवा!’

Twitter

Whatsapp 9822152955

Email  datta.narnale@gmail.com

पहिल्या विजयासह शिखर धवनने पदार्पणाच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवून आपल्या कॅप्टन्सी कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. तर प्रशिक्षक राहुल द्रविडने देखील सिनिअर संघाचं प्रशिक्षकपद सांभाळताना पहिल्या विजयाची नोंद केली.

दै. मराठवाडा पत्र टीम

शिखर धवन-राहुल द्रविड-रवी शास्त्री

मुंबई : पहिल्याच एकदिवसीय सामन्यात भारताच्या नवोदित खेळाडूंनी श्रीलंकेला हिसका दाखवला . सलामीवीर शिखर धवन-पृथ्वी शॉ यांची झंझावाती सुरुवात आणि त्यानंतर इशान किशनने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने लंकेला 7 विकेट्स आणि 80 चेंडू राखून लोळवलं. या विजयासह शिखर धवनने पदार्पणाच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवून आपल्या कॅप्टन्सी कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. तर प्रशिक्षक राहुल द्रविडने देखील सिनिअर संघाचं प्रशिक्षकपद सांभाळताना पहिल्या विजयाची नोंद केली. टीम इंडियाच्या धडाकेबाज कामगिरीनंतर आता भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची निवड करण्यात यावी, त्यासाठी रवी शास्त्रींना हटवा, अशी मागणी होऊ लागली आहे. सोशल मीडियावर हजारो नेटकरी ही मागणी करु लागले आहेत.

द्रविड-धवनची शानदार सुरुवात

द्रविड-धवनने आपल्या नव्या इनिंगला झोकात सुरुवात केली. पहिल्यात सामन्यात लंकेला 7 विकेट्सने नमवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. याचसोबत शिखर धवनने आपल्या कॅप्टन्सी करिअरमधील पहिल्या विजयाची नोंद केली. तर सिनिअर संघाचं प्रशिक्षकपद सांभाळताना द्रविडने देखील विजयाने खातं उघडलं. यानंतर आता रवी शास्त्रींना ह़टवून राहुल द्रविडकडे मुख्य प्रशिक्षपदाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी नेटकरी करु लागले आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा