स्पार्कल फोटो स्टुडिओचे आई-वडीलांच्या हस्ते उदघाटन
पिंपळवंडीच्या तरुणाची फोटो स्टुडिओ व्यवसायाकडे यशस्वी वाटचाल
आई-वडिलांच्या हस्ते अनोखे उदघाटन……!

बीड। देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना सुशिक्षित तरुण व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत. तसेच स्पर्धेच्या युगामध्ये नोकरी मिळणे अवघड झालेले असताना कोरोना महामारीमुळे आणखीनच परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. त्यामुळे व्यवसाय हा पर्याय डोळ्यासमोर ठेऊन पिंपळवंडी येथील निलेश पवार यांनी स्पार्कल फोटो स्टुडिओ व्यवसायाला सुरवात केलीय. यात विशेष बाब म्हणजे दुकानाचं उदघाटन दुसऱ्या -तिसऱ्या विशेष अतिथी हस्ते न करता आपल्या आई -वडिलांच्या हस्ते केलं.
उदघाटन म्हटलं की आपण काही खास व्यक्तींना निमंत्रित करतो आणि त्यांच्या हस्ते उदघाटन करतो. समाजाच्या या विचाराच्या दिशेला फाटा देत या तरुणानं आई- वडिलांनाच प्रमुख अतिथी मानून त्यांच्या हस्ते स्वागत केलंय. खऱ्या अर्थाने आपले आई वडीलच आपल्यासाठी सर्वकाही असतात. हेच जणू त्यांला सांगायचंय.
निलेश पवार या तरुणानं पिंपळवंडी सारख्या खेडे गावातून बीड शहरात येऊन दोन वर्ष ओळखीच्या फोटो स्टुडिओवर फोटोग्राफी मधील कला अवगत केली. आणि बीड शहरात आज स्वतः च्या फोटोग्राफीची सुरवात केली.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा