पूरग्रस्तांना मदतकरून पंकजाताईंचा वाढदिवस साजरा करणार- राजेंद्र मस्के
 

सोमवारी बीड शहरात मदत फेरीचे आयोजन

 बीड ।

भाजपा राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांचा वाढदिवस पूरग्रस्तांना मदत करून साजरा करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली.

26 जुलै रोजी लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस. बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात वाढदिवस मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा केला जातो. देशातील कोरोना महामारी्ची स्थिति आणि राज्यातील अतिवृष्टीचे  भयावह संकट लक्षात घेवून राज्यातील पूरग्रस्तांना मदत आणी  सामाजिक उपक्रमाद्वारे दिवस साजरा करण्याचा निर्णय बीड जिल्हा भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आल. आज संघर्ष योध्दा भारतीय जनता पार्टीचे  संपर्क कार्यालयात  जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के  यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

या बैठकीत अॅड. सर्जेराव तात्या तांदळेप्रा.  देविदास नागरगोजेसलीम जहांगीरविक्रांत हजारीजगदीश गुरखुदेभगवानराव केदारशंकर देशमुखसुभाष धसशेख जमादारशिवाजीराव मुंडेसौ जयश्री मुंडेचंद्रकांत फडसंजय सानप,  डॉ. लक्ष्मण जाधव,प्रमोद रामदासीविजयकुमार पालसिंगण करसंग्राम बांगरकिरण बांगर,भूषण पवारगणेश पुजारीशांतिनाथ डोरले,शरद झोडगे ,नागेश पवारहरीश खाडेअनिल चांदणेविठ्ठल ढोकळसौ छाया मिसाळजयश्री रणसशिंग,शेख ईशारद भाईसंभाजी सुर्वेनरेश पवारकल्याण पवारबद्रीनाथ जटाळपंकज धांडेदत्ता परळकरघोलप मामासचिन जाधव ,सुरेश माने रवींद्र काळेसानेसमीर सय्यदविनायक मुंडेप्रदीप जोगदंड,शेख फारुखआदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 आज महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टीने थैमान मांडले. कोल्हापूर,सांगलीसाताराचिपळूणमहाड आदी भागात  महापुराने तांडव घातले असून हजारो नागरिकांचे संसार वाहून गेले. पूराच्या नैसर्गिक आपत्तीत अडकल्याने  प्रचंड दारुण अवस्था पूरग्रस्त त्यांच्या वाट्याला आली आहे. अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्य या बाबतीत समस्या निर्माण झाल्या आहेत या आपत्तीग्रस्त नागरिकांना मानवतेच्या भावनेतून मदतीचा हात देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला सोमवारी बीड शहरात मदत केली काढून सजगशील नागरिकांकडून मदत जमा केली जाणार आहे शिवाय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडून वैयक्तिक मदत घेतली जाणार आहे.  प्राधान्याने तातडीची मदत उपलब्ध करून देण्यासाठी कपडाअन्नधान्यकोरडे खाद्य पदार्थऔषधे आदी जीवनावश्यक वस्तूं मदत फेरी दरम्यान  स्वीकारण्यात येतील. जमा झालेली सर्व मदत पूरग्रस्त भागात पाठवण्यात येईल. अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली आहे.सोमवारी बीड शहरा निघणाऱ्या मदत फेरीला बीड शहरवासीयांनी सामाजिक भावनेतून यथाशक्ती मदत द्यावी असेही आवाहन बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी

संघर्षयोद्धा भाजपा जनसंपर्क कार्यालय कॅनल रोड बीडजगदीश भैय्या गुरखुदे यांचे संपर्क कार्यालय टिळक रोडपेठ बीड विभागासाठी आंबेडकर पुतळा येथे सोमवारपासून मदत संकलन केंद्र सुरू करण्यात येत आहेत. रोख रक्कम अथवा वस्तूच्या स्वरूपात मदत स्वीकारली जाईल.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा