श्री साईराम अर्बन मल्टिस्टेटचा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्काराने गौरव




 

श्री साईराम अर्बन मल्टिस्टेटचा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्काराने गौरव

बीड । महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्टेचा दीपस्तंभ राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार बीड येथील श्री साईराम अर्बन मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ली बीडला महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशनद्वारे राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार व सहकार संवाद परिषद पार पडली. पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेशरावजी वाबळे साहेब आदी मान्यवरांच्या हस्ते रुपये 100 कोटी ते 150 कोटी गटातील राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा दीपस्तंभ पुरस्कार श्री साईराम अर्बनला सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. श्री साईराम अर्बन मल्टिस्टेटने यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री शाहिनाथ विक्रमराव परभणे साहेब संचालक लक्ष्मण विक्रमराव परभणे संचालक सुभाष अप्पासाहेब उगले संचालक श्रीराम सूर्यभान बोबडे शाखांव्यवस्थापक सुपेकर रवींद्र अर्जुनराव व श्री लांडे भागवत वचिष्ट उपस्थित होते. संस्थेची व्यवसायवृद्धी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, वसुली यंत्रणा, सहकार चळवळीसाठी योगदान सामाजिक कार्य आदी आर्थिक निकषावर महाराष्ट्रात सहकार चळवळीत दिशादर्शक व दीपस्तंभासारखे काम करणाऱ्या संस्थांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. श्री साईराम अर्बन मल्टिस्टेटने अल्पकाळात 110 कोटीच्या ठेवींचा टप्पा पार केला असून संस्थेच्या एकूण पाच जिल्ह्यात 18 शाखाद्वारे कामकाज सुरु आहे. मल्टीस्टेट व पतसंस्था चळवळीच्या महाराष्ट्राच्या कार्यात संस्थेचे अध्यक्ष शाहिनाथ विक्रमराव परभणे हे अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. सात वर्षात संस्थेला 10 पुरस्कार मिळाले आहेत आणि म्हणून हि आदर्श संस्था म्हणून महाराष्ट्रामध्ये नावलौकिक मिळवलेला आहे. मिळालेल्या पुरस्कारामुळे संस्थेचे खातेदार ठेवीदार कर्जदार व हितचिंतक या सर्वाचे मान उंचावणारी असून संस्थेचे अध्यक्ष परभणे साहेब यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा