साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त व्याख्यानमाला
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त व्याख्यानमाला

बीड l  मुप्टा ( महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टिचर असोशिएशन ) मराठवाडा विभागाच्या वतीने “मुप्टा प्रबोधन” साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव 2021, ऑनलाईन व्याख्यानमाला चे आयोजन करण्यात आले आहे.
मुप्टा शिक्षक संघटनेच्यावतीने महापुरुषांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचारांचा जागर व्हावा व महापुरुषांच्या विचाराचे समाजकार्य व्हावे असे कार्य सातत्यपूर्वक केले जाते. Covid-19 या आजाराच्या काळात मागील दीड वर्षापासून मुप्टा च्या वतीने ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रम घेतले जातात. सामाजिक समतेचे कार्य व मुप्टा शिक्षक संघटना ही आगळी वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. शैक्षणिक व सामाजिक कार्य मुप्टा संघटनेच्यावतीने सातत्यपूर्वक होत आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंती निमित्ताने दि. 30/ 07/ 2021 ते 04/ 08/ 2021 रोजी सायंकाळी 8 वाजता ‘मुप्टा प्रबोधन’ ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.30/07/2021 सायं.8 वा. विषय: जागतिक साहित्यात अण्णाभाऊंच्या साहित्याचे स्थान.- मा. प्रा. डॉ. सुरेश चौथाईवाले,औरंगाबाद.
दि.31/07/2021 सायं.8 वा. विषय:
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे समाजशास्त्रीय विश्लेषण.- मा. प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, लातूर.
दि.01/08/2021 सायं.8 वा. विषय: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य.- मा. रवींद्र जोगदंड, औरंगाबाद.
दि. 02/08/2021 सायं.8 वा. विषय: आरक्षण: सत्य आणि विपर्यास.- मा. प्रा. डॉ. अशोक नारनवरे, लातूर.
दि.03/ 07/2021 सायं.8 वा.विषय: ओबीसी: अस्तित्वाचा लढा शक्य आहे.- मा. प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर, औरंगाबाद.
दि. 04/07/2021 सायं.8 वा. विषय: नेतृत्वाची बदलती भूमिका आणि चळवळी समोरील आव्हाने.- मा. प्रा. डॉ. दयाराम मस्के,हिंगोली. इत्यादी प्रमाणे प्रमुख व्याख्यात्यांचे विविध विषयावर ती व्याख्यान होणार आहे
तरी या व्याख्यानाचा लाभ सर्वांनी ऑनलाइन रोज सायंकाळी 8 वाजता गुगल मीट – https://meet.google.com/ntz-yjji-dzz या संकेतस्थळावरून घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे मुख्य संयोजक प्रा. सुनील मगरे (मुप्टा- संस्थापक सचिव), प्रा.प्रदीप रोडे ( अध्यक्ष- मुप्टा जिल्हा बीड) प्रा. डॉ. हर्षवर्धन कोल्हापुरे, प्रा. डॉ. पंचशील एकंबेकर, मुप्टा, मराठवाडा विभाग सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा