जीवन शिक्षण ची कु.भक्ती मुंडे बारावीत ९९.५० टक्के गुण घेऊन जिल्हयात प्रथम
जीवन शिक्षण ची कु.भक्ती मुंडे बारावीत ९९.५० टक्के गुण घेऊन जिल्हयात प्रथम

कु.भक्ती मुंडे ला दहावीतही होते ९७ टक्के गुण

किल्ले धारूर। धारूर तालुक्यातील गांजपूर येथील जीवन शिक्षण उच्च माध्यमिक विद्यालयाचा १२ वी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून विज्ञान शाखेतील ११७ विद्यार्थी तर कला शाखेतील ५७ विद्यार्थी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयाच्या विज्ञान शाखेतून कु.भक्ती ईश्वरराव मुंडे ही ९९.५० टक्के गुण मिळवून बीड जिल्ह्यातून प्रथम आली आहे.
कु.भक्ती ईश्वरराव मुंडे हीने सन.२०१९ मध्ये श्री खोलेश्वर विद्यालय अंबाजोगाई येथून ९७ टक्के गुण घेवून विशेष प्राविण्यासह दहावी उत्तीर्ण केली होती.
चि.भालेराव गणेश उद्धव व कु.प्रतिक्षा विजयकुमार मुंडे यांनी ९४.८३% गुण मिळवून विद्यालयातून द्वितीय क्रमांक मिळवला आहे तसेच चि.गणेश बालासाहेब कांदे याने ९४. ५० % गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे चि.अजित भारत झिरमाळे याने ९३.५०% गुण मिळवून विद्यालयातून चतुर्थ येण्याचा मान मिळवला आहे
कला शाखेतून कु.तेजस्विनी मधुकर समुद्रे ८८ .८३% गुण मिळवून प्रथम कु. रोहिणी विश्वंभर जगताप हीने ८८.३३% गुण मिळवुन व्दितीय, चि.अशोक सर्जेराव दहिफळे ८७.६६% गुण मिळवुन तृतीय तर चि.अशोक गोवर्धन मैंद याने ८६.००% गुण मिळवुन चतुर्थ क्रमांक मिळवला आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विक्रम सारूक,शिक्षणाधिकारी माध्यमिक,श्रीकांत कुलकर्णी शिक्षणाधिकारी प्राथमिक,उप शिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे,काकडे,गुंड,प्रशासन अधिकारी हिरालाल कराड,ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल चे प्रदेश सरचिटणीस प्रा.ईश्वर मुंडे,प्राचार्य विजयकुमार मुंडे,प्रा.महादेव केदार, प्रा अरूण समुद्रे, प्रा नाथा ढगे, प्रा मंगल वटाणे लिपिक पोपट कदम आदिंनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
कु.भक्ती ईश्वरराव मुंडे शी माध्यम प्रतिनिधींनी संपर्क साधला असता पुढे कला शाखेतून पदवी घेवून यु.पी.एस.सी.स्पर्धा परिक्षेद्वारे भारतीय प्रशासकीय सेवेत जाऊन देश सेवा करणार असल्याचे सांगितले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा