बालासाहेब फड यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी बढती
बालासाहेब फड यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी बढती

परळी l  दि.06 परळी शहरापासून जवळच असलेल्या छोट्याशा मांडवा या गावचे रहिवासी, सर्वसाधारण गरीब कुटुंबात जन्म घेऊन त्यांनी पोलीस विभागात मध्ये भरती झालेले स्वकर्तुत्वावर पोलीस खात्यामध्ये अनेक पदांवर कामगिरी बजावल्या आहेत, परळी येथे स्थानिक गुन्हे शाखेचे काम पाहत होते, ते सध्या अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे जमादार म्हणून काम करत आहेत, ते ज्या ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली आहे, अनेक मोठ्या गुन्ह्यांचा तपास त्यांनी लावला आहे, स्थानिक गुन्हे शाखेचे काम करत असताना त्यांचा शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर जबरदस्त जरब होता, त्यांनी पोलिस खात्यात काम करून खूप मोठा मित्रपरिवार निर्माण केला आहे, परळी अंबाजोगाई बीड जिल्हा मित्रत्वाचे जाळे निर्माण केले कितीही गंभीर गुन्ह्यातील आरोपी त्याचा शोध घेणे त्यांच्यासाठी सहज शक्य होत असेल अशी त्यांची कारकीर्द राहिलेली आहे, परळी शहरात राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण व अतिसंवेदनशील भागात काम करून पुढे अंबाजोगाई येथे डीवायएसपी कार्यालयात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी व कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी म्हणून ज्यांची ख्याती आहे असे बालासाहेब फड यांची आज सह पोलीस निरीक्षक पदावर ती बडती झाली आहे, निश्चितपणे पोलीस खात्याला त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल त्यामुळे या भागातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत मिळणार आहे, त्यांच्या पोलीस क्षेत्रातील कार्यची दखल घेत त्यांना आज सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी बडती देण्यात आली आहे त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे व पुढील कार्यास शुभेच्छा दिले जात आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा