श्री संत सावता महाराज यांची पुण्यतिथी साजरी
संत सावता महाराज पुण्यतिथी

पिंपळनेर ।  बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे मेहत्रे परिवाराच्या वतीने संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन शनिवार रोजी सकाळी करण्यात आले होते. यावेळी भजन, आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.
पिंपळनेर येथे मेहत्रे परिवाराच्या वतीने गत शकडो वर्षापासून अखंडपणे प्रत्येक वर्षी संत शिरोमणी संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात येत आहे. सध्या मदनराव नामदेवराव मेहत्रे हे पुण्यतिथी कार्यक्रमाची परंपरा यशस्वीपणे पार पाडत असून त्यांनी सकाळी संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर पिंपळनेर येथील भजनी मंडळास निमंत्रण देऊन भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भजनी मंडळाने अंभग, गवळणीचे गायन केले. त्यानंतर दुपारी 12 वा. आरती करुन गुलाल उधळण्यात आला. यावेळी भाविकांनी भक्तीभावाने संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. यानंतर भजनी मंडळ व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाला भजनी मंडळ, भाविकभक्त व मेहत्रे परिवार उपस्थित होता.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा