अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईसाठी उपविभागीय आधिका-यांना निवेदन




 

बीड l  जिल्ह्य़ातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती पाटोदा तालुकाध्यक्ष शेख जिलानी, भ्रष्टाचार निर्मूलन समिती बीड तालुकाध्यक्ष शेख युनुस च-हाटकर, पत्रकार हमीदखान पठाण, शेख जावेद,शेख महेशर ,यांनी उपविभागीय आधिकारी पाटोदा यांना बी. के.मोरे नायब तहसीलदार, उपविभागीय कार्यालय पाटोदा यांच्यामार्फत निवेदन दिले.

पाटोदा तालुक्यातील मौजे चुंबळी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार करून फासावर लटकवले असल्याबाबत मुलीच्या वडीलांनी लेखी तक्रार दाखल केली असून त्याप्रकरणात राजकीय आणि विशिष्ट समाजाचा दबाव वाढल्यामुळे न्याय मिळण्यात दिरंगाई होऊ शकते त्यामुळेच संबधित प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि बीड जिल्ह्य़ातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात वाढ झाल्यामुळे पोलीस प्रशासन तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर निर्णय घ्यावेत यासाठी पोलीस अधिक्षक बीड, उपविभागीय आधिकारी, तहसिलदार पाटोदा, पोलीस निरीक्षक पाटोदा यांच्यामार्फत गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले यावेळी निवेदनावर
सय्यद जुबेर सय्यद फुरकान, सय्यद जुनेद, शेख साहील, आवेज सय्यद, फैय्याज पठाण, मोईन खान, शेख अमन, शेख शोएब, यांच्या स्वाक्ष-या आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा