पोलीसांची धाड आंटी ताब्यात ; पीडितेची सुटका एसपींच्या विशेष पथकासह एलसीबीची कारवाई




बीडमधील कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड 

बीड । शहरातील पालवण चौकाजवळ नाथनगर भागातील एका घरात सुरु असलेल्या कुंटणखाण्यावर पोलीस अधीक्षक आर . राजा यांचे विशेष पथक आणि एलसीबीच्या पथकाने छापा मारून दोन पिडीत महिलांची सुटका केली . यावेळी त्या पिडीतांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या आंटीला बेड्या ठोकण्यात आल्या . ही कारवाई सोमवारी ( 9 ऑगस्ट ) दुपारी करण्यात आली .

या कारवाई बाबत सविस्तर माहिती अशी की , नाथनगर येथील एक महिला तिच्या घरातून कुंटणखाणा चालवत असून परिसरातील काही पिडीत महिलांकडून ती जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली होती . त्याआधारे पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सापळा रचला आणि डमी ग्राहकामार्फत ( पंटर ) त्या महिलेशी संपर्क साधला असता तिने दोन महिला उपलब्ध असल्याचे सांगितले . सोमवारी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास पोलिसांनी दोन पंटर जवळ रक्कम देऊन त्या महिलेच्या घरी पाठवले.खोलीत जाताना पंटरांनी इशारा करताच पोलिसांच्या पथकाने छापा मारला आणि दोन खोल्यातून दोन पिडीतांना ताब्यात घेतले . ती महिला ( आंटी ) आमच्याकडून जबदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असून मिळणाऱ्या रकमेतील अर्धी रक्कम ती ठेऊन घेते अशी माहिती पिडीतांनी दिली . पोलिसांनी आंटीला बेड्या ठोकून तिच्या खोलीची झडती घेत रोख रक्कम , मोबाईल असा एकूण 7 हजारांचा मुद्देमाल जप्त केला व दोन्ही पीडितांची सुटका केली . याप्रकरणी एपीआय विलास हजारे यांच्या फिर्यादीवरून सदर आंटीवर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमान्वये बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला . ही कारवाई पोलीस अधीक्षक आर . राजा , एलसीबीचे पोलीस निरिक्षक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विलास हजारे , पीएसआय भारती , पोलीस कर्मचारी वाळके , उगले , बहीरवाळ , खटाणे व नेवडे यांनी पाडली .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा