कोरोनाच्या संकटामुळे समारंभपूर्वक वाढदिवस साजरा न करण्याचा बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचा निर्णय
 

कोरोनाच्या संकटामुळे समारंभपूर्वक वाढदिवस साजरा न करण्याचा बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचा निर्णय

परळी :- बीड जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रावर कोरोनाच्या संकटाचे सावट आहे.अनेक जीवाभावाचे लोक जग सोडून गेले आहेत.या भिषण व भयावह परिस्थितीत संवेदना ठेवत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या ११ ऑगस्ट रोजी असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सर्वांचे प्रेम सदैव माझ्यासाठी उर्जादायी असुन वाढदिवसा वरील उत्सवी स्वरुपातील अनाठायी खर्च टाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

कोरोनामुळे सर्वत्र परिस्थिती गंभीर असून परळी शहर देखील कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या परिणामांना सामोरे जात आहे.अनेकजण जीवाभावाचे लोक जग सोडून गेले आहेत. या परिस्थितीत समारंभ पुर्वक वाढदिवस करणे मनस्वी टाळावे वाटते. सर्वांच्या शुभेच्छा – आशीर्वाद मला लढण्याचे बळ देतात, परंतु कोरोनाशी व या भयावह परिस्थितीशी लढण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे. स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, कोरोनाला बीड जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातून कायमचे हद्दपार करण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करुयात, याच माझ्यासाठी यावर्षीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील असेही बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा