जनतेचा आरोग्य जाहीरनामावर अंबाजोगाई तालुक्यातील विविध संस्था, संघटना प्रतिनिधीनी घेतली आ.संजयभाऊ दौंड यांची भेट




  अंबाजोगाई [प्रतिनिधी ] तालुक्यातील विविध संघटना, संस्था प्रतिनिधी यांनी मा. आ. श्री. संजयभाऊ दौड यांची भेट घेऊन जनतेला मोफत दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी व असंघटीत क्षेत्रातील विविध मजूर वर्गाचे प्रश्न मांडले.  त्यात महत्त्वाचे खालील प्रश्नाचा सहभाग होता.महाराष्ट्र जन आरोग्य अभियानाने तयार केलेली जनतेचा आरोग्य जाहीरनामातील तरतुदी लागू करण्यासाठी विधान सभेत व विधान परिषदेत पाठपुरावा करावा. यात महाराष्ट्र सरकारने आरोग्यसेवेच्या हक्काचा कायदा करावा, आरोग्य विभागाचे बजेट सध्याच्या प्रमाणात। किमान तीनपट वाढवावे, औषधी खरेदी व वितरण प्रणालीमध्ये तामिळनाडू, राजस्थानया राज्याच्या धर्तीवर आमुलाग्र बदल करावे,  महाराष्ट्र क्लिनिकल एस्टाब्लिशमेन्ट कायदा आणणे, सार्वजनिक आरोग्य सेवा ही लोककेंद्रीत आणि लोकांप्रति उत्तरदायी बनवणे. मेडिकल महाविद्यालयातील रिक्त पदे त्वरित भरण्यासाठी पाठपुरावा करावा. आरोग्य सेवेतील कंत्राटी पद्धतीने होणारी पद भरती बंद करून कायम स्वरूपी पद भरती करण्यात यावी. प्रा. आ. केंद्राला 15 वर्षा पूर्वी रुग्णवाहिका मिळाल्या होत्या आज या सर्व रुग्णवाहिकाच आजारी आहेत, कुठे, केव्हा बंद पडेल हे सांगता येत नाही, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या डॉक्टर वर्गाची फार तारांबळ झाली, काही जागी जनतेच्या रोषाला पुढे जावे लागले त्यामुळे तिसऱ्या लाटे पूर्वी सर्व प्रा आ केंद्रास नवीन रुग्ण वाहिका देण्यात यावी. कोरोनाची तिसरी लाट येण्याची भाकीत विविध तंज्ञ करीत आहेत म्हणून कोरोना काळात शासनाने तयार केलेल्या गाव  दक्षता समित्या कागदावर न राहता प्रत्यक्ष कार्यरत असाव्यात याची जबाबदारी सरपंच, ग्रामसेवक, गावातील मुख्याध्यापक यांच्यावर देण्यात यावी .आरोग्य सेवेतील सर्व कर्मचारी वर्गासाठी आरोग्य विमा लागू करण्यात यावा. असंघटीत क्षेत्रातील कामगारासाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आहे पण कामगार कार्यालय जिल्हा पातळीवर बीडला आहे, या कार्यालयाचे सब कार्यालय प्रत्येक तालुक्यात असावे जेणेकरून नोंदणीकृत मजुरांना त्यांच्या हक्काच्या योजनेचा लाभ घेता येईल इत्यादी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. सर्व मुद्दे अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन संजय भाऊयांनी दिले.
या बैठकीला मानावलोक संस्था, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन, जमाते इस्लाम हिंद, डी. वाय. एफ. आय., ऐकल महिला संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदआरोग्य सेवा कर्मचारी संघटना, डोंगर विकास समिती, आशा संघटना, ज्ञान प्रबोधनी इत्यादी संस्था संघटना प्रतिनिधी उपस्थित होते. मानावलोकचे कार्यवाह श्री अनिकेत लोहिया यांनी आरोग्य सेवेचे व असंघटित कामगार वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व संस्था, संघटना, ट्रेड युनियन यांनी एकत्र येऊन सात्यत्याने आपल्या लोकप्रतिनिधीवर दबाव आणण्याचे आव्हान केले, यासाठी मानावलोक संस्था नेहमी सर्वांच्या सोबत राहण्याचे आश्वासन दिले.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा