परळीत जनता चॅरिटेबल हॉस्पिटल निर्माण करण्याचा संकल्पचित्रासह व्यक्त केला मनोदय
परळी वैजनाथ, (समीर इनामदार ):- शहराच्या चौफेर व सर्वंकष विकासात्मक, सकारात्मक जडणघडणीत योगदान देण्याची सातत्याने तळमळ माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांची दिसुन येते.या जनसेवेच्या ध्यासातुन त्यांच्या माध्यमातून अनेक रचनात्मक कार्य व उपक्रम परळीत कार्यान्वित आहेत.यावर्षीचा वाढदिवस समारंभपूर्वक करण्याचे त्यांनी टाळले आहे.मात्र वाढदिवसाच्या दिवशी सामाजिक, समृद्ध संवेदना जपणारा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.परळीत जनता चॅरिटेबल हॉस्पिटल निर्माण करण्याचा  मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. या संकल्पनेला तमाम परळीकरांचा प्रतिसाद मिळत आहे.
           राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या प्रेरणेतून आज (दि.११)  माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी वाढदिवसानिमित्त  परळीचे माजी नगराध्यक्ष स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी यांच्या स्मरणार्थ नागरिकांच्या सुविधेसाठी व सर्वांचा इलाज अतिशय माफक पद्धतीने व्हावा या उद्देशाने परळीच्या अगदी जवळच एक “जनता चॅरिटेबल हॉस्पिटल” निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. तसेच “जनता चॅरिटेबल हॉस्पिटल” चे  संकल्पचित्रही प्रकाशित केले आहे. या संकल्पनेला तमाम परळीकरांचा प्रतिसाद मिळत आहे. या संकल्पपुर्तीने परळी व परिसरातील नागरिकांना मोठा लाभ होईल.तसेच माफक दरात उपचार उपलब्ध होणार असल्याने सामान्य माणसाला दिलासा मिळणार आहे.या संकल्पनेला मोठ्या प्रमाणावर नागरीकांचा प्रतिसाद व पाठबळ मिळत आहे.वाढदिवसाच्या दिवशी जाहीर केलेल्या जनसेवेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना  हजारो नागरिक, हितचिंतक यांच्या कडून कौतुक,सदीच्छा, शुभेच्छा व आशिर्वाद याचा वर्षाव होत आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा