जिल्ह्यातील सर्व सरपंच यांनी 15 ऑगस्ट 2021 रोजी च्या ग्रामसभेत ठराव घेण्याचे आव्हान




बीड जिल्ह्यातील सर्व सरपंच यांनी 15 ऑगस्ट 2021 रोजी च्या ग्रामसभेत ठराव करण्याची विनंती

महाराष्ट्रात कोरोनाने विधवा झालेल्या २०,००० महिला आहेत. या महिलांना सरकारने आर्थिक मदत करावी व एकूणच समाजातील एकल महिलांसाठी धोरण जाहीर करावे. यासाठी शासनाकडे ‘ महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती , महाराष्ट्र राज्य ‘ पाठपुरावा करत आहे.

बीड जिल्ह्यातील सन्माननीय सरपंच आणि उपसरपंच यांना विनंती कि आपण रविवार दिनांक १५ ऑगस्ट 2021 रोजी होणाऱ्या आपल्या गावात होणाऱ्या ग्रामसभेत खालील आशयाचा ठराव मांडावा ही नम्र विनंती

ठराव नमुना

महाराष्ट्रात कोरोनाने विधवा झालेल्या २०,००० महिला आहेत.यापैकी ब-याच कुटुंबांची आर्थिक स्थिती विदारक झाली असून या कुटुंबांना शासनाने ५ लाख रुपयांची मदत द्यावी. त्यांच्या विधवा पेन्शनमध्ये वाढ करावी व या महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी उपाययोजना कराव्यात. सर्व शासकीय नौकरी भरतीत व शेतीविषयक योजनांमध्ये या महिलांना प्राधान्य देण्यात यावे. एकूणच समाजातील सर्वच एकल महिलांसाठी कायमस्वरूपी धोरण जाहीर करावे अशी विनंती करणारा ठराव ही ग्रामसभा मंजूर करत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा