सीएस साबळे साहेब थोडे नेकनूर रुग्णालयाकडे लक्ष द्या !




 

पंधरा वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या महिला डॉक्टर नेकनूर रूग्णालयातील “मै हूं डॉन”

स्त्री रुग्णालयातील महिला डॉक्टर कडून रूग्णासह पोलीस उपनिरीक्षक यांना अरे तुरे ची भाषा.

नेकनूर । (दि 14 ) रामनाथ घोडके:- रुग्णांना आणि कर्मचाऱ्यांना आरे वारी करणे हे नेकनूर रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी नाझीया शेख यांचे नेहमीचेच कार्य , असे असताना कर्तव्य दक्ष सीएस म्हणून परिचित असणाऱ्या डॉ साबळे यांच्या कार्यकाळात नेकनूर रुग्णालयातील एक महिला डॉक्टर आरोपी मेडीकल साठी घेऊन गेलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यांसोबत चक्क अरेरावीची ची भाषा करत असतांना आता या बाबत सीएस साबळे काय कार्यवाही करतील असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नेकनूर येथील स्त्री व कुटीर रुग्णालयात पंधरा वर्षा पासून ठाण मांडून बसलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी सध्या वादग्रस्त ठरत आसून वारंवार त्यांच्या अनेक तक्रारी रुग्ण करत आहेत. त्यांचा रुग्णालयातील कारभार म्हणजे मै हूं डॉन पेक्षा कमी नाही. रुग्णालयात रुग्ण आल्यानंतर उपचारा ऐवजी त्यांना या महिला डॉक्टर चे बोलणे ऐकून घ्यावे लागत आहे. रुग्णालयातील कर्मचारी रुग्ण आल्यानंतर डॉक्टर महाशयांना बोलवण्यास सुद्धा टाळतात एवढी दहशत त्यांनी रुग्णालयात निर्माण केली आहे आज तर त्यांनी चक्क आरोपींची तपासणीसाठी घेऊन गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक यांना महिला डॉक्टर यांनी अरे तुरे ची भाषा वापरून अपमानित मेडिकलचे पेपर फेकून देत आरोपीचे मेडिकल करणारच नाही सी एस ला सांग नाही तर अजून कोणाला सांग अशी भाषा वापरत मी रुग्णालयातील डॉन असल्याचे दाखवून दिले.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हे आपल्या काही कर्मचाऱ्यांसह आरोपींचे मेडिकल करण्यासाठी नेकनूर स्त्री व कुटीर रुग्णालयात शुक्रवारी सकाळच्या वेळी गेले असता त्याठिकाणी ओपीडी वर कोणीच नसल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांना डॉक्टरांना बोलावण्यास सांगितले.त्यानंतर काही वेळाने ड्युटीवर असणाऱ्या श्रीमती नाझिया या आल्या व त्यांनी पोलीस उप निरीक्षक यांना तू सारखे सारखे आरोपी घेऊन का येतोस असे म्हणत मी आरोपीचे मेडिकल करणार नाही, तुला जे करायचे ते कर असे म्हणून अपमानित केले. महिला अधिकारी असल्याने पोलिसांनी काहीही न बोलता आरोपींचे मेडिकल करून घेतले. ड्युटीवर असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला या महिला डॉक्टर कडून जर अशी वागणूक मिळाली. नाझीया यांची ड्युटी दिसल्यानंतर रुग्ण रुग्णालयात उपचार घेण्याचे टाळत असल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना जीव मुठीत घेऊनच दवाखान्यात जावे लागत आहे. सदरील महिला डॉक्टर गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी सेवेत असून यापूर्वीही रुग्णा बरोबर असे प्रकार झाल्याची चर्चा आहे.याबाबत वरिष्ठांनी योग्य ती दखल घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी संबंधित महिला अधिकाऱ्याला समज देऊन कारवाई करणे गरजेचे आहे .अन्यथा डॉक्टर व रुग्णांमधील दुरावा वाढत जाईल.

तात्काळ बदली करा

पंधरा वर्षांपासून नेकनूर रुग्णालयात ठाण मांडून बसलेल्या वैद्यकीय अधिकारी नाझीया नेहमीच रूग्णासह कर्मचाऱ्यांवर वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. एकच डॉक्टर एकाच गावात एकाच रुग्णालयात पंधरा पंधरा वर्षे ड्युटी करून रुग्णांना वेठीस धरत आहेत. रुग्णालयात काम न करता केवळ झोपण्यासाठी येत असून जर कोणी रुग्ण उपचारासाठी आला तेव्हा कर्मचाऱ्यांची त्यांना बोलवण्याची हिंमत होत नाही. त्यामुळे केवळ झोपण्यासाठी आणि आराम करण्यासाठी त्यांना लाखो रुपये पगार शासन देतंय का असा प्रश्न उपस्थित केला जात असून त्या महिला डॉक्टरांची तात्काळ बदली करण्याची मागणी होत आहे.

या प्रकारणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ साबळे आणि नेकनूर रुग्णालयातीचे वैद्यकीय अधीक्षक आशिलेश शिंदे यांना या प्रकरणाबद्दल विचारपूस करण्यासाठी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा