बीड मधील श्रावण सोमवारी गजबजली शिवमंदिरे
श्रावण सोमवारी गजबजली शिवमंदिरे

Marathwada patra Teem

Updated: Aug 16, 2021

श्रावण महिन्यातील पहिल्या व आज दुसऱ्या सोमवारी (दि.16) शहरातील सोमेश्वर मंदिर, कंकालेरेश्वर मंदिर, बेलेश्वर मंदिर, पापनेश्वर मंदीर व बारा ज्योतिर्लिंग मंदिरांसह अनेक भागातील शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती.

दै. मराठवाडा प्रतिनिधी, बीड

शिव मंदिरांमध्ये पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘ॐ नम: शिवाय’ मंत्र म्हणून शिव व पार्वतीची विधिव्रत पूजा, अभिषेक करण्यात आला. मंदिरांच्या परिसरात भगवान शंकराला वाहिल्या जाणाऱ्या बेलाच्या पानांची आणि फुलांची दुकाने मोठ्या प्रमाणात सजली होती. शहरातील कंकालेश्वर व सोमेश्वर मंदिरांत भाविकांच्या गर्दीमुळे परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. श्रावण सोमवारनिमित्त भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर दिवसभर उघडे ठेवण्यात आले आहे. कोरोनाच्या या महामारीमूळे प्रशासन दक्ष आहे. त्यामुळे भाविक भक्त गर्दी टाळून दर्शनाचा लाभ घेतांना दिसत आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा