प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थीतीत अँड.गणेश करांडे यांचा काॅग्रेस पक्षात जाहीर प्रवेश 
 

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थीतीत अँड.गणेश करांडे यांचा काॅग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

औरंगाबाद। महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमीटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या औरंगाबाद येथील गांधी भवनातील पक्षाच्या विभागिय बैठकीत बीड,उस्मानाबद,लातुर या जिल्ह्या बैठकी दरम्याण अँड.गणेश करांडे,बीड यांचा पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला.
बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यात आग्रसर आसणारे तथा कायम चळवळीत काम करणारे बीड जिल्ह्याचे वकीलीक्षेत्रात काम करणारे अँड.गणेश करांडे यांचा काॅग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला.यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर (पापा)मोदी,सेवा दलाचे शहादेव हिंदोळे,योगेश शिंदे,अँड.कृष्णा पंडीत,बीड तालुकाध्यक्ष अँड.महादेव धांडे यांच्या सोबत अँड.राहुल साळवे,जयप्रकाश अघाव,डाॅ.ईद्रिस हास्मी, शामसुंदर जाधव,अँड.‌श्रीनिवास बेद्रे, यांच्या मार्गदर्शनात बीड जिल्ह्याच्या वतीने शिफारस करुन पक्षवाढीसाठी सदरचा काॅग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश कमीटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे,चंद्रकांत हांडोरे,उच्च शिक्षण मंत्री अमित देशमुख,बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,रविद्र दळवी,प्रशांत पवार तर बीड जिल्हनिरीक्षक संतसंघ मुंडे हे देखील या प्रवेशाच्या कार्यक्रमा दरम्याण उपस्थीत होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा