सत्तेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते जिल्हा हिवताप कार्यालयातील बोगस प्रमाणपत्र वितरण प्रकरणी धनंजय मुंडे सामाजिक न्याय देतील काय ?- डाॅ. गणेश ढवळे
सत्तेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते जिल्हा हिवताप कार्यालयातील बोगस प्रमाणपत्र वितरण प्रकरणी धनंजय मुंडे सामाजिक न्याय देतील काय .?  – डाॅ. गणेश ढवळे


बीड । तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी बीड जिल्हा हिवताप कार्यालयातुन फवारणी कर्मचा-यांना बोगस एनओसी प्रमाणपत्र दिल्याची चौकशी करण्यात यावी अशी सहसंचालक हिवताप आरोग्य सेवा संचालनालय पुणे यांना तक्रार दिली होती, त्याच तक्रारीची सत्ताधारी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड न्याय देतील काय अशी विचारणा करत सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी धनुभाऊ यांनाच लेखी तक्रार करून चौकशीची मागणी करत आंदोलनाचा ईशारा दिला आहे.

बीड जिल्हा हिवताप कार्यालयातुन वितरीत प्रमाणपत्र पडताळणी केल्याशिवाय नोकर भरती करण्यात येऊ नये, आरोग्य मंत्री, प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य मंत्रालय यांना तक्रार:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
बीड जिल्हा हिवताप कार्यालयातुन बोगस प्रमाणपत्र वितरीत करत आत्मदहन करण्याचा ईशारा रत्नागिरी येथील हिवताप कर्मचा-यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात अन्याय झाल्याचे म्हटले आहे.त्यामुळेच बीड जिल्हा हिवताप कार्यालयातुन वितरीत प्रमाणपत्र पडताळणीशिवाय नोकर भरती करण्यात येऊ नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी मुख्यमंत्री, प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य मंत्रालय, आयुक्त आरोग्य सेवा संचालनालय मुंबई, सहसंचालक हिवताप आरोग्य सेवा संचालनालय पुणे यांना ईमेल द्वारे केली आहे. अन्यथा आंदोलनाचा ईशारा दिला आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा