वेतनासाठी शिक्षकांचे उपोषण
०८ महिण्यापासुनचे वेतन द्या;आश्रमशाळा वडझरी शिक्षकांचे आमरण उपोषण।

बीड । दि‌.२५ । संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रमशाळा वडझरी ता. पाटोदा जि. बीड या शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर श्री. थिटे राहुल अनिल (सहशिक्षक श्री सानप अशोक सोनाजी (सहशिक्षक) श्री. आंधळे मच्छिद्र मारुती (सहशिक्षक)श्री.नेवळे प्रदिप जेजेराव (सहशिक्षक श्री वनवे कालिदास जालिंदर ( सहशिक्षक श्री. बांगर दिपक सयाजीराव (सहशिक्षक ) श्री. सानप धनंजय रामराव (सहशिक्षक श्री. जायभाये संजय महादेव ( सहशिक्षक सौ लोंढे रेखा ज्ञानदेव ( स्वयंपाकी ) यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२१ पासुन तब्बल ०८ महिण्यापासुन वेतन दिलेले नाही. मा. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बीड यांनी मुख्याध्यापक यांना वारंवार कळवून देखील सदर मुख्याध्यापक दिलेल्या आदेशाचे पत्राचे पालन करत नाहित. हि अत्यंत खेदजनक व गंभीर स्वरुपाची बाब आहे. मुख्याध्यापक शासनाच्या ध्येय धोरणाप्रमाणे कामकाज करत नाहीत तसेच जाणिव पुर्वक प्रशासनाची दिशाभुल करुन शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना हक्कापासुन वंचित ठेवतात. वेतन व वेतनाचे अनुज्ञेय लाभ देत नाहीत. कोरोना महामारी सारख्या साथीच्या रोगात जीवाची पर्वा न करता पोलिस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांच्या बरोबर सदरिल कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावून सुदधा त्यांना जाणिवपुर्वक वेतनापासून वंचित ठेवले आहे.

मुख्याध्यापक हे शासनाच्या ध्येय धोरणानुसार कामकाज करित नाहीत तसेच वरिष्टांच्या आदेशाचे पालन करित नाहीत म्हणुन मा. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बीड यांनी सदर शाळेवर प्रशासक नियुक्त करावे असे मा. प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग औरंगाबाद यांना कळविले होते. त्यानुसार मा प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग औरंगाबाद यांनी प्रशासक म्हणुन मा. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बीड यांची शिफारस केलेली आहे. परंतु आद्याप पर्यंत मा प्रधान सचिव, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या कडुन प्रशासक नियुक्तीची कार्यवाही प्रलंबीतच आहे. सदर शाळेवर प्रशासकाची नियुक्त करुन शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मा. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बीड यांचे पत्र क्र. ८५८ दिनांक ११/०८/२०२१ / मा. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण
बीड यांचे पत्र क्र. ९०३ दिनांक १८/०८/२०२१ उपोषण प्रधान्य पत्रातील मागण्या दिनांक २४/०८/२०२१ पर्यंत पूर्ण होतील अशी फलदायी कार्यवाही करावी. जेणेकरुन सदरिल कर्मचाऱ्यांना दिनांक २५/०८/२०२१ च्या मा. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बीड यांच्या कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषणास बसण्या पासून परावृत्त करणे प्रशासनास सोईस्कर होईल. उपरोक्त निवेदनातील मागण्या मान्य करुन कर्मचाऱ्यांना न्याय द्यावी अशी मागणी केली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा