सात हायवा, दोन ट्रॅक्टर एक लोकेशनची स्कॉर्पिओ आणि ५० ब्रास वाळु साठा जप्त




  1. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी मध्यरात्री केली कार्यवाही.

गेवराई l

तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातुन स्टॉक टेंडरच्या नावाखाली अनधिकृत वाळु उपसा व विना रॉयल्टी पावतीची अवैध वाळु वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली व  ठोस कार्यवाही करण्यात आली.
अखेर काल दि. २५ बुधवार रोजी मध्यरात्री स्वत: मा. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मा. पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी, तहसिलदार सचिन खाडे व पोलिस अधिक्षक विशेष पथक प्रमुख एपिआ विलास हजारे यांनी गोदावरी नदी पात्रात उतरुन नदिच्या काठावर केलेल्या अनधिकृत वाळु साठा भरुन नेण्यासाठी आलेली सात हायवा व लोकेशन करत असलेली एक स्कॉर्पिओ असा एकुन दोन कोटींचा मुद्देमाल जप्त केल्याची माहीती तहसिलदार खाडे यांनी दिली .
या ठोस कार्यवाहीने टेंडरधारकासह वाळु माफियांचे ढाबे दणाणले असून तत्कालीन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केलेल्या कार्यवाही नंतरची हि सर्वात मोठी कार्यवाही मानली जाते.
काल मध्यरात्री १२ ते पहाटे ३ वाजेपर्यंत हि कार्यवाही सुरू होती तर आज दि. २६ गुरुवार रोजी दुपारी ३ च्या दरम्यान नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, मंडळ अधीकारी सानप व पखाले यांनी म्हाळस पिंपळगाव येथे दोन ट्राक्टर व जवळपास ५० ब्रास अवैध वाळु साठा जप्त केला.
जप्त केलेली सात हायवा तहसिल कार्यलयात गेवराई येथे लावण्यात आली तर दोन ट्राक्टर व ५० ब्रास अवैध वाळु साठ्यावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.

मा. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व गौणखनिज विभाग यांनी संयुक्तरित्या ठोस कार्यवाही करावी अशी मागणी जनसामान्यांतुन होत होती. येथील स्थानिक नागरिकांनी मागणी मेलद्वारे मा. विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे देखील स्टॉक टेंडरच्या नावाखाली होत असलेल्या अनधिकृत वाळु उपसा व अवैध वाहतुकीवर ठोस कार्यवाही करन्यात यावी अशीही मागणी केली होती.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा