कमी भावात सोन्याचे आमिष दाखवून लुटले
 

पाचोड : कमी भावात सोने देण्याचे आमिष दाखवून लुटमारी करण्याची घटना पैठण तालुक्यातील चौढांळा शिवारात बुधवारी घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून नागरिकांनी आमिषाला बळी न पडता सतर्क राहण्याचे आवाहन पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी केले आहे.
अधिक माहिती अशी की, आकाश दिलीप दुधाने रा. खिंगर (ता. महाबळेश्वर जि. सातारा) यांच्याकडे पंधरा-वीस दिवसांपूर्वी जालना येथील गणेश चव्हाण हा गवंडी कामास होता. त्यातुन त्यांची ओळख झाली होती. गणेश याने आकाश दुधाने यांना आपणास कमी पैशात सोने देण्याचे फोन येत असून माझ्याकडे पैसे नाहीत, तुम्ही घेत असाल तर पाहा. मी समोरच्या व्यक्तीला तुमचा मोबाईल नंबर देतो. असे सांगून त्यांचे मन जिंकले. गणेशने आकाश दुधाने यांचा मोबाईल नंबर त्या टोळी प्रमुखास दिला.
यानंतर पाच -सहा दिवसांनी आकाश यांना कॉल आला. समोरच्या व्यक्‍तीनेआपल्याकडे जुने दोन किलो सोने असून आपले नाव अर्जून असून तुम्हाला पाहिजे असल्यास चोंढाळा (ता.पैठण) येथे पाहायला या म्हणून सांगितले. त्यानुसार आकाश व त्याचा मेहुणा शैलेश भिलारे हे दोघे जण मंगळवारी (ता.24) जीपने सोने पाहण्यासाठी चौंढाळा शिवारात गेले. तेथे त्यांची कृष्णा व अर्जून नावाने बोलणार्‍या व्यक्तीशी भेट झाली. त्यांनी आकाश व त्याच्या मेहुण्यास सोन्याचे नाणे दाखवून दोन लाखात दोन किलो सोने देतो, व्यवहार करून टाका म्हणून सांगितले. रात्र झाल्याने दुसर्‍या दिवशी व्यवहार करण्याचे ठरल्याने ते भांबेरी (ता.अंबड) येथे मुक्कामी गेले. दुसर्‍या दिवशी बुधवारी (ता.25) आकाशने 50 हजार व मेहुणा शैलेश यांनी दीड लाख रुपये सोबत घेऊन चौंढाळा गाठले. भांबेरी रस्त्यावर त्यांना फोनवर बोलणारे कृष्णा व अर्जुन भेटले, त्यांनी पैसे आणले का म्हणून विचारले. त्यांनी होकार देताच त्यांनी पुढे चला म्हणत तुर व कापसाच्या शेतात आडवळणी नेले. त्यांच्या पोटावर व गळ्याला चाकू लावून आकाशच्या खिशातील पन्नास हजार रुपये व मोबाईल काढून घेतला. तर आकाश यांनी एका दुचाकीस्वारास थांबवून पाचोड पोलीस ठाणे गाठले. यावेळी ते चौघे जण आपआपसात कृष्णा, अर्जुन्या, आट्या, पारश्या नावाने बोलत होते. असे आकाश दुधाने याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे व त्यांचे सहकारी करीत आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा