मराठा आरक्षण समन्वय समितीच्या राज्याध्यक्षपदी शिवक्रांतीचे गणेश बजगुडे पाटील यांची निवड 




  • मराठा आरक्षण समन्वय समितीच्या राज्याध्यक्षपदी शिवक्रांतीचे गणेश बजगुडे पाटील यांची निवड
पुणे l मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा व राज्यातील ४२ संघटनेचा सहभाग आसलेल्या मराठा आरक्षण समन्वय समितीच्या राज्याध्यक्षपदी बीड येथील शिवक्रांती संघटनेचे संस्थापक गणेश बजगुडे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. गणेश बजगुडे हे विद्यार्थी दशेपासून गेली वीस वर्षे मराठा आरक्षण लढ्यामध्ये काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वात राज्यभरात आणेक आंदोलने झाली त्यांना कारावास ही भोगावा लागला तरी देखील त्यांनी आपले कार्य कायम समाजहिताच्या दृष्टीने चालूच ठेवले. कोरोणा काळात मोर्चा नको याभुमिकेवर त्यांनी बीडमधून विनायक मेटे यांच्या मोर्चाला प्रचंड विरोध ही केला होता. त्याअनुषंगाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता तरी देखील ते आपल्या भूमिकेवर ठाम राहत मेटेच्या मोर्चाला विरोध केला होता मोर्चाच्या अनुषंगाने त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. गणेश बजगुडे हे अतिशय आक्रमक रित्या समाजासाठी काम करत असून ते शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांची मराठवाड्यासह महाराष्ट्रात आणेक जिल्ह्यात तरुणांची स्वतंत्र फळी असून त्यांच्या निवडीने मराठा आरक्षण व समाजाच्या सर्वच विषयाला आक्रमक धार येईल. त्यांच्या माध्यमातून चांगल्या नेतृत्वाला संधी मिळाली असून त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे राज्यभरातून अभिनंदन होत आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा