आसरा’चा उपक्रम! बेलखंडीमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, तब्बल १४० दात्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी




‘आसरा’चा उपक्रम! बेलखंडीमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, तब्बल १४० दात्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

बीड : बीड जिल्ह्यातील बेलखंडी येथील प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र महादेव संस्थान येथे नुकतेच रक्तदान शिबीर घेण्यात आले. ‘आसरा सोशल फाउंडेशन’च्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील तब्बल १४० नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक दायित्त्व जोपासले.
कोरोनामुळे मोठी रक्तदान शिबिरे आयोजित करणे कठीण झाले आहे. त्यातच राज्याच रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे. रक्तदात्यांना, शासकीय संस्थांना रक्तदान करण्यासाठी आवाहन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘आसरा सोशल फाउंडेशन’च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
याच अनुषंगाने बेलखंडी (ता.बीड) येथे नुकतेच रक्तदान शिबीर घेण्यात आले. गावातील समाजसेवक युवक निळकंठ येळवे यांच्या प्रयत्नातून तथा महेश तरुण मित्र मंडळ व बेलखंडी ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. यावेळी तब्बल १४० नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करुन या शिबिरात सहभाग नोंदविला. रक्तदान शिबिर आयोजित करताना आयोजकांनी सोशल डिस्टन्सिंगसह मास्क आणि सॅनिटाईझरचा योग्य वापर केला.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा