दुचाकी चोर गजाआड गुन्हेशाखेची कारवाई




दै. मराठवाडा पत्र live

बीड । दुचाकी चोरी करून पोबारा करणाऱ्या दोन आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला . ही कारवाई २७ ऑगस्ट रोजी शहरातील सम्राट चौक परिसरात करण्यात आली . त्यांच्याकडून चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या .

संभाजी किसन घाडगे ( २३ , रा . गौरवाडी , ता . केज ) , नीलेश सुरेश सटले ( २१ , रा . बरंगळवाडी , ता . शिरूर ) अशी आरोपींची नावे आहेत . शहरातील वाढत्या दुचाकीचोरीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेची पथके सतर्क झालेली आहेत . संभाजी घाडगे हा दुचाकी चोरी करून नीलेश सटलेमार्फत विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती . त्यानुसार २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी त्या दोघांना शहरातील सम्राट चौक परिसरातून ताब्यात घेतले . सुरुवातीला त्यांनी आढेवेढे घेतले ; पण खाक्या दाखविल्यावर त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली . त्यांच्याकडून दोन लाख किमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत .
शहर व शिवाजीनगर ठाणे हद्दीतून त्यांनी प्रत्येकी एका दुचाकीची चोरी केल्याची कबुली दिली . इतर दोन दुचाकींबाबत चौकशी सुरू आहे . त्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले . आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे . दरम्यान , २८ ऑगस्ट रोजी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले . न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली . पोलीस नाईक जालिंदर बनसोडे तपास करीत आहेत .
पुण्यात धुमाकूळ – संभाजी घाडगे हा पुण्यात कंपनीत कामासाठी गेला होता . मात्र , तेथे त्याने दुचाकीचोरीचे गुन्हे सुरु केले . त्याच्यावर पुणे व परिसरात दहा गुन्हे नोंद आहेत . गेल्या काही महिन्यांपूर्वी तो बीडला आला . काही दिवस त्याने खासगी दवाखान्यात वॉर्डबॉय म्हणूनही काम केले . तो अट्टल दुचाकीचोर असून बीडमध्ये पहिल्यांदाच पोलिसांच्या तावडीत सापडला आहे .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा